आरक्षणाचा वापर फक्त राजकीय पदासाठीच : पुरुषोत्तम खेडेकर

वसंत कांबळे
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

कुर्डू (सोलापूर) : आरक्षणाचा लाभ मराठ्यांनी राजकारणासाठी जास्त घेतला व इतर कारणासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण न मिळण्यामध्ये आतापर्यंत सर्व मराठा नेतेच जबाबदार आहेत. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कुर्डू ता. माढा येथे संकेत मंगल कार्यालय येथे आयोजित मराठा जनसंवाद दौऱ्याच्या वेळी केले. 

कुर्डू (सोलापूर) : आरक्षणाचा लाभ मराठ्यांनी राजकारणासाठी जास्त घेतला व इतर कारणासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण न मिळण्यामध्ये आतापर्यंत सर्व मराठा नेतेच जबाबदार आहेत. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कुर्डू ता. माढा येथे संकेत मंगल कार्यालय येथे आयोजित मराठा जनसंवाद दौऱ्याच्या वेळी केले. 

यावेळी प्रदेश मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, पुणे विभागाचे अध्यक्ष उत्तम माने शेंडगे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष अशा टोणपे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष मोहन नलवडे, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद तालुकाध्यक्ष ऋषिकेश मुंगसे, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड गोटू मोरे, सरपंच पोपट आलदर, शहराध्यक्ष भाजपा महिला आघाडी नीताताई खटके, शहराध्यक्ष भाजपा कुर्डवाडी संजय टोणपे, आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते

खेडेकर म्हणाले, इंग्रज सरकारने केलेल्या नोंदीत मराठ्यांचा मराठवाडा वगळता सर्वत्र कुणबी असाच उल्लेख आहे व कुणबी ही जात ओबीसी मध्ये आहे. याचा फायदा अनेक मराठा नेत्यांनी राजकीय पदासाठी केला आहे. सध्याच्या काळात शासकीय नोकऱ्या संपल्या आहेत, मराठा तरुणांनी आवडेल ते काम करून मराठा समाजानेच समाजाचा विकास करणे हाच एकमेव उपाय असून प्रत्येकाने आपल्या घरात शिवाजी तयार करून त्याच्या पाठीमागे आई-वडिलांनी खंबीर उभे राहिली पाहिजे. मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी मराठा सेवा संघाची आहे.

त्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. आली यावेळी  प्रदेशाध्यक्ष अर्जुन तनपुरे, उत्तमराव माने यांनी जिजाऊ सृष्टी व मराठा आरक्षण विषयक मराठा सेवा संघाची भूमिका आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विशद केली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक टी आर पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय चवरे व आभारप्रदर्शन दिनेश जगदाळे यांनी केले.

राणे समितीने मराठ्यांना 16 टक्के आरक्षण मिळावे आवाहल शासनाला पाठवला असला तरी तो घटनाबाह्य आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्यास घटनेच्या अधीन राहून मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकते.
मराठा सेवा संघाच्या राजकारण राजकीय भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले पुढचा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री संभाजी ब्रिगेडचा असेल मराठा सेवा संघ त्यांच्या पाठीशी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation is used only for political post : Purushottam Khedekar