कोल्हापूरच्या रेश्‍माला राष्ट्रीय कुस्तीत सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

मुंबई ः कोल्हापूरच्या रेश्‍मा माने हिने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 63 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर सोनाली तोडकर, तसेच मूळ महाराष्ट्राच्या; पण रेल्वेकडून खेळणाऱ्या वैभव काळेनेही रौप्यपदक पटकावले.
रेश्‍माने निर्णायक लढतीत गार्गी यादवचा पाडाव केला; मात्र बीडची सोनाली 58 किलो गटातील लढतीत सॅफ स्पर्धा विजेत्या मंजूविरुद्ध पराजित झाली. मंजूने ताकद व चपळाईचा सुरेख संगम साधत 10-0 असा विजय संपादला.

पुरुषांच्या 57 किलो गटात आशियाई विजेत्या संदीप तोमरने उत्कर्ष काळेला हरवले. उत्कर्षने माजी जागतिक रौप्यपदक विजेत्या अमित कुमारला हरवून पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. या स्पर्धेत माजी जागतिक ब्रॉंझ पदकविजेत्या बजरंग पुनियाने 65 किलो फ्रीस्टाईल गटात बाजी मारली, तर 74 किलो गटात जितेंदर अव्वल ठरला. ग्रीकोरोमन प्रकारात रविंदर (66 किलो), गुरप्रीत (75 किलो) व प्रतिपाल (85 किलो) यांनी बाजी मारली.

Web Title: reshma wins gold at national wrestling