चोखोबा समाधीच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावू - आ. परिचारक

हुकूम मुलाणी
रविवार, 6 मे 2018

संत चोखोबाच्या 680 व्या पुण्यतिथी सोहळ्यातील संगीत भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण व  सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संत चोखोबांच्या समाधीस यावेळी महाभिषेक करण्यात आला.

मंगळवेढा (सोलापूर) - फार वर्षापासून प्रलंबित असलेल्या चोखोबाच्या समाधी जागेबाबत नगरपरिषदेला विश्वासात घेवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याबाबतीत घोषणा केलेली आहे. त्यासाठी पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

संत चोखोबाच्या 680 व्या पुण्यतिथी सोहळ्यातील संगीत भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण व  सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संत चोखोबांच्या समाधीस यावेळी महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी मुख्य संपर्क अधिकारी भूपेन्द्र मुजुमदार, चांगदेव कांबळे, विष्णुपंत आवताडे, अॅड. नंदकुमार पवार, प्रा. येताळा भगत, यादव आवळेकर यांच्यासह भक्तगण उपस्थित होते. 

आ. परिचारक पुढे म्हणाले, की संत चोखामेळामुळे मंगळवेढ्याची ओळख महाराष्ट्रात झाली. पण समाधी स्थळाकडे लक्ष दिले गेले नाही. समाधीच्या जागेसाठी सर्वस्तरातुन प्रयत्नाची गरज आहे. यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अविनाश शिंदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. श्री पांडूरंग पतसंस्थेच्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Resolve the question of Chokoba Samadhi soon in mangalvedha