रेठऱ्यात झिरो बजेट ऊस लागण यंत्र

अमोल जाधव
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

रेठरे बुद्रुक - शेतीमध्ये मजुरांअभावी व वाढत्या खर्चामुळे व्यवस्थापन सांभाळणे शेतकऱ्यांना तितकेसे सोपे राहिलेले नाही. एकीकडे मजुरांचा तुटवडा, दुसरीकडे वाढती मजुरी, मशागत व कृषी निविष्ठांचा खर्च या सर्वांचा मेळ घालताना शेतकऱ्यांच्या नाकी दम येतो आहे. शेतकऱ्यांच्या बिकट प्रसंगात येथील अविनाश रामचंद्र कुलकर्णी व रामचंद्र हणमंत उमराणी या दोघांनी साथी हात बढाना...अशी भावना ठेवून शून्य खर्चामध्ये ऊस लागण करून देणारे यंत्र विकसित केले आहे. 

ऊस लावणीच्या वाढत्या खर्चावर आपण काही उपाय करू शकू का? असा विचार या दोघांच्या मनामध्ये वर्षभरापासून डोकावत होता. त्याला चालना देत काही महिन्यांपूर्वी त्यांनी कृषी विभागाकडून अनुदानावर मिळालेले बीबीएफ प्लॅन्टर (पेरणीयंत्र) याकामी वापरात आणले. ऊस लागणीचे यंत्र बाजारामध्ये दोन-अडीच लाखांपर्यंत उपलब्ध आहे. इतक्‍या महागातील यंत्रे खरेदी करणे शेतकरी बांधवांना परवडणार नाही. परंतु, हेच काम बीबीएफ प्लॅन्टरद्वारे आपण सफल करू, हा उद्देश यामागे त्यांनी ठेवला.

प्लॅन्टरमध्ये आवश्‍यक बदल त्यांनी स्वतःच केले. त्यासाठी गॅरेज वा कारागिराचा आधार घेतला नाही. यंत्र बनविण्याकामी स्वतःच्या मजुरीसह अवघा एक हजार रुपये खर्च आला. तयार झालेल्या यंत्रास ट्रॅक्‍टरला जोडून ऊस लागण केली जाते. पेरणीपूर्व मशागत पूर्ण झालेल्या शेतात केवळ माग काढण्यासाठी साडेचार फुटाची सरी सोडल्यानंतर हे यंत्र ऊस लागणीसाठी चालवता येते. तुटलेल्या बियाण्यावर बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सदरच्या यंत्रावर ठेवून लावणी करणे शक्‍य होते. सुमारे दीड तासात एक एकरातील लागण पूर्ण होते. यंत्रावरील लावणीमुळे बियाण्याची कांडी मातीआड जात असल्यामुळे ती वाळत नाही. लागणीनंतर तुषार सिंचनाद्वारे पाणी देता येते. आजमितीस एकरी ऊस लागणीकामी मशागतीपासून लागणीपर्यंत एकरी साडेतीन हजार रुपये खर्च येतो. कुलकर्णी व उमराणी यांच्या या प्रयोगामुळे तो निम्म्याने वाचवणे शक्‍य झालेले आहे. त्याचबरोबर कमीत कमी मजुरांचा आधार घेता येतो. त्यांनी या यंत्राद्वारे स्वतःच्या आठ एकर क्षेत्रातील ऊस लागण पूर्ण केली आहे.

दोन गुंठ्यातील बियाण्यावर चार एकर लागण पूर्ण 
पारंपरिक ऊस लागण पध्दतीत मजूर वर्ग उसाच्या कांडीवरील डोळा बघत नाहीत. त्यामुळे बरेचसे बियाणे खराब होते. बीजप्रक्रिया करताना मजूर वर्ग वाढीव मजुरीची मागणी करतात. परंतु, या यंत्रामुळे आम्हाला केवळ तीन मजुरांच्या साह्याने लागण करता आली. त्याचबरोबर दोन गुंठ्यातील ऊस बियाण्यावर चार एकरातील उसाची लागण पूर्ण झाली, असे या दोघांनी सांगितले.

Web Title: rethare budruk satara news zero budget sugarcane plantation machine