सापडलेले पाकीट गुगल मॅपच्या आधारे केले परत

solapur
solapur

उपळाई बुद्रूक (सोलापुर) - सोशल मिडियाचा योग्य वापर केला तर त्याचे खुप फायदे आहेत. याचे ताजे उदाहरण माढा शहरात पहायला मिळाले. सचिन हनुमंत साठे (रा.माढा) याला माढा तहसीलच्या आवारात पैशाचे पाकीट सापडले होते. सोशल मिडियाच्या आधारे त्याने संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि हे पैशांचा पाकिट त्याला परत केले. 

प्रामाणिकपणा संपत चालला आहे, सोशल मिडीयामुळे तरूणाई बिघडतेय अशी ओरड सर्वत्र होत असते. परंतु, याला अपवाद माढा शहरातील ही घटना आहे. सचिन साठे याला माढा तहसील कार्यालयाच्या आवारात पैसे व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट सापडले. त्याने पाकीट उघडुन पाहिले असता. प्रविण काळे (रा. इंदापुर) यांचे पाकीट असल्याचे त्याला कळाले. पाकीट परत देण्यासाठी साठे याने पाकिटात असलेल्या नंबरवर संपर्क साधला परंतु, काळे यांच्या संपर्क होऊ शकला नाही. शेवटी सोशल मिडीयावरती मेसेज फॉरवर्ड करण्यात आला. त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे गुगल मॅपवरून घराचे लोकशन शोधुन घराजवळील दुकानदारांशी संपर्क साधुन पाकीट सापडले असल्याची माहिती देण्यात आली.

मंगळवारी सकाळी माढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे व सचिन साठे यांच्या हस्ते काळे यांना पाकीट सुपूर्द करण्यात आले. यावेळी नितीन साठे, नाना साठे, राजू साठे, प्रताप कदम, प्रितम गवळी, नितीन राऊत आदि उपस्थित होते. सोशल मिडीयाचा चांगल्या कामासाठी योग्य वापर करून सचिन याने सर्वांसमोर वेगळा आदर्श मानला आहे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com