नाला खोलीकरणासाठी खुद्द महसूल खात्याचा खो

हुकूम मुलाणी 
सोमवार, 2 जुलै 2018

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील चिक्कलगी येथील कोल्हापूर बंधाऱ्याच्या लोकसहभागातून नाला खोलीकरण रुंदीकरण कामास खुद्द महसूल खात्यानेच खो घातला आहे. हे चालू काम थांबवण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या तसेच रुंदीकरण होत असलेल्या कामातील 40 ब्रास वाळू उचलून नेली म्हणून सरपंचासहीत 10 जणांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न होत असल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच दिनेश पाटील यांनी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी चिक्कलगी येथील इश्वरापा पाटील शेती गट न 47 मध्ये कोल्हापूर बंधाऱ्याच्या फुगवटा क्षेत्रातील लोकसहभागातून नाला खोलीकरण रुंदीकरण करण्याच्या कामास लघुपाटबंधारे खात्याकडून 9 लाख 7 हजार इतका निधीतून ओढ्यावर 33 हजार घन मिटर काम करण्यास रीतसर मंजुरी दिली.

तसेच काम चालू करताना ग्रामपंचायतीने तहसीदाराकडे रुंदीकरण करतेवेळी वाळू, माती बाजूला टाकण्याची मागणी रीतसर केली आहे सध्या नाला रुंदीकरणाचे काम सुरू असून येथील सरपंच निगोंडा उर्फ दिनेश पाटील,यांच्यासह 10 जणांनी येथील 40 ब्रास वाळू उचलल्याचे दाखवत दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या असून रुंदीकरणाचे काम थांबवण्याच्या सुचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

एकीकडे जलसंधारणाची कामे लवकर व्हावी यासाठी शासन पाठपुरावा करीत आहे परंतु या भागात चालू कामाला महसूल खात्याने खीळ घातली आहे तालुक्यात मोठया प्रमाणात वाळू चोरून नेली जात असताना महसूल खाते आर्थिक हितसंबंधातून मूग गिळून गप्प आहे इथे मात्र निधी शिल्लक असताना काम थांबत आहे याबाबत सरपंचांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.  

येथील  नाला रुंदीकरणाच्या कामास रीतसर मंजुरी असून केवळ ओढ्यावर काम सुरू असून यांची आर्थिक मागणी पूर्ण न केल्यामुळे आम्हा 10 जनांना वाळू चोरीची नोटीस देत काम बंद करण्यास सांगितले.
- सरपंच निगोंडा पाटील

चिक्कलगी येथील 10 जणांवर ओढ्यातील  वाळूचोरीबाबत कायदेशीर कारवाई  केली असून सरपंचाकडून चुकीची माहिती दिली जात आहे.
-विजय शिंदे, तलाठी

Web Title: revenue department declines work of nala