हल्लाबोलच्या प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची टाळाटाळ

सचिन शिंदे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलन व त्यातून होणाऱ्या टिकांना उत्तर देण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाळले.

कऱ्हाड - शैक्षणिक कार्यक्रमात कसला हल्लाबोल करता, असा पत्रकरांनाच प्रतिप्रश्न करून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलन व त्यातून होणाऱ्या टिकांना उत्तर देण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाळले. मंत्री श्री. पाटील यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने त्यांनी पाळलेले मौन कार्यकर्त्यांना मात्र आवाक् करणारे ठरले. 

कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास मंत्री पाटील आले होते. त्यावेळी कार्यक्रमांनतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रय़त्न केला. कृष्णाचे कुलगुरू डॉ. सुरशे भोसले, विनायक भोसले व विठ्ठल रूक्मीणी मंदीरे ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले उपस्थित होते. कार्यक्रमांनंतर मंत्री श्री. पाटील यांना पत्रकारांनी प्रश्नं विचारले. राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन केले आहे, त्यावर आपले मत काय? असा प्रश्न विचारताच त्यांनी शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलो आहे. येथे कसला करता हल्लाबोल असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.

राष्ट्रवादी करत असलेल्या आरोपाबाबतही त्यांना छेडले असता त्यांनी केवळ स्मित हास्य करून त्याचेही उत्तर देण्याचे टाळले. विरोधक मदत न करता गोंधल घालत आहेत, त्याबाबत काँग्रसेने ही नौटंकी आहे, असा आरोप केला आहे. त्यावर आपले मत काय, असे विचारताच त्यांनी काहीही न बोलता थेट त्यांना आणलेल्या वाहनात बसणेच पसंत केले. खासदार उदयन राजे भोसले यांची भेट झाली होती. त्यात काय विशेष होते, या प्रश्नावरही त्यांनी केवळ स्मित हास्य करून उत्तर देण्याचे टाळून ते निघून गेले. पत्रकारांनी विचारलेल्या सलग प्रश्नांना एकही उत्तर न देता मंत्री पाटील निघून गेले खरे मात्र त्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते आवाक् झाले होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Revenue Minister Chandrakant Patil Dont Talks About Hallabol Agitation