रिक्षात विसरलेले एक लाख रुपये मिळाले परत

सुदर्शन हांडे 
रविवार, 24 जून 2018

रिक्षावरील वाढला विश्वास....
रिक्षा म्हंटले की थिल्लरपणा, साऊंडचा वाढलेला आवाज, रस्त्याने वेडेवाकडे वाहन चालवणे असा प्रकार पूर्वी होता. पण अलीकडील काळात अधिकृत रिक्षाचे वाढते प्रमाण, पोलिसांनी केलेले वर्गीकरण, चालकांना दिलेल्या सूचना या परिनामातून व हनुमंत गडदे सारख्या प्रामाणिक रिक्षा चालकांन मुळे रिक्षा वरील विश्वास वाढत आहे. 

बार्शी : बार्शी शहरात सर्वत्र सामाजिक संस्थांच्या व बार्शीकरांच्या सहकार्याने सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. याच तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने एका रिक्षात प्रवास्याचे विसरलेले एक लाख रुपये व महत्वाची कागदपत्रे काही वेळात मिळून आली. 

या बाबत अधिक माहिती अशी की शनिवारी (ता..२३) वालवड, ता. भूम (जि. उस्मानाबाद) येथील निलेश बाबासाहेब दुधाळ हे बार्शी येथे कामा निमित्त आले होते. बार्शी येथे ते रिक्षाने काही ठिकाणी गेले. याच दरम्यान त्यांनी महत्वाची कागदपत्र व एक लाख रुपये असलेली बॅग रिक्षात मागील बाजूस ठेवली होती. ही बॅग त्याच रिक्षात विसरली होती. या बाबत रिक्षा चालकस ही माहिती नव्हती. रिक्षा निघून गेल्या नंतर काही वेळाने दुधाळ यांना आपली बॅग रिक्षात विसरली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना सर्व माहिती दिली. 

पोलिसांनी बार्शी शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही ची मदत घेत रिक्षा ज्या परिसरातून गेला, जिथे थांबला तेथील फुटेज काढून रिक्षाचा क्रमांक शोधुन काढला. रिक्षा क्रमांक शोधला. एम.एच. १३ ए. एफ. २३६५ क्रमांकाची रिक्षा व बार्शी पोलिसांनी अधिकृत रिक्षांना दिलेला क्रमांक बीटीपी २२१ हे असल्याचे निश्चित होताच पोलीस रेकॉर्ड वरून रिक्षा चालकास फोन करून सदरील बॅग रिक्षात विसरली आल्याचे सांगितले. रिक्षा चालकाने तात्काळ पोलीस स्टेशन गाठत दुधाळ यांना प्रामाणिकपणे एक लाख रुपये व महत्वाची कागदपत्र असलेली बॅग परत केली. 

तात्काळ झालेल्या या शोध कामात ज्या प्रमाणे सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरले त्याच प्रमाणे बार्शी पोलिसांनी अधिकृत रिक्षाचे वर्गीकरण करून रिक्षा मालकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशी माहिती एकत्र केली आहे. त्या माहितीचा उपयोग या कामा मध्ये झाला आहे. करण केवळ सीसीटीव्ही फुटेज मिळाले असते तर संमधीत रिक्षा चालक कोण, रिक्षा कोणाच्या नावकार रजिस्टर आहे इतर माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळण्यास वेळ गेला असता. बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या अधिकृत रिक्षा सर्वेक्षण व त्यांना दिलेल्या बीटीपी नंबर या मुळे या तापसास अधिक गती प्राप्त होत काही वेळात गहाळ झालेली बॅग मिळून आली. हा तपास पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर, वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गोसावी, आवटे यांनी केला. प्रामाणिक रिक्षा चालक हनुमंत नागनाथ गडदे (रा.जमगाव) व तपास करणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रिक्षावरील वाढला विश्वास....
रिक्षा म्हंटले की थिल्लरपणा, साऊंडचा वाढलेला आवाज, रस्त्याने वेडेवाकडे वाहन चालवणे असा प्रकार पूर्वी होता. पण अलीकडील काळात अधिकृत रिक्षाचे वाढते प्रमाण, पोलिसांनी केलेले वर्गीकरण, चालकांना दिलेल्या सूचना या परिनामातून व हनुमंत गडदे सारख्या प्रामाणिक रिक्षा चालकांन मुळे रिक्षा वरील विश्वास वाढत आहे. 

Web Title: rickshaw driver back money to customer