रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कात कपात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सोलापूर - रिक्षा परवाना नूतनीकरणाच्या अतिरिक्त शुल्कात मोठी कपात करण्यात आल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. या संदर्भातली अधिसूचना बुधवारी जारी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूर - रिक्षा परवाना नूतनीकरणाच्या अतिरिक्त शुल्कात मोठी कपात करण्यात आल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. या संदर्भातली अधिसूचना बुधवारी जारी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

परवान्याची मुदत संपल्यावर रिक्षाचालकांना नूतनीकरणासाठी पाच हजार रुपये भरावे लागत होते. हे शुल्क अवाजवी असल्याने ते भरणे अशक्‍य होते. राज्य शासनाने १० फेब्रुवारी २०१६ रोजी परवाना शुल्कामध्ये वाढ केली होती. त्यास विरोध करीत अनेक संघटनांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत श्री. देशमुख यांनी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शुल्क कमी करणारा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर केला होता. शुल्क कमी करण्यासाठी श्री. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार अधिसूचना निघाली असून, अत्यंत माफक शुल्क आकारले जाणार आहे. परवान्याच्या विधी ग्राह्यतेच्या अंतिम तारखेपूर्वी १५ दिवसांपासून दोन महिने किंवा दोन महिन्यांच्या आत मिळणाऱ्या परवाना नूतनीकरणासाठी २०० रुपये, दोन ते चार महिन्यांपर्यंत ५०० रुपये, चार ते सहा महिन्यांच्या आत एक हजार रुपये, सहा ते आठ महिने दोन हजार, आठ ते १० महिने चार हजार, १० ते पुढील कालावधीसाठी पाच हजार रुपये शुल्क घेतले जाईल. यापूर्वी प्रत्येक नूतनीकरणासाठी प्रती महिना पाच हजार रुपये भरावे लागत होते, आता या निर्णयामुळे कमी शुल्क भरावे लागेल. ज्या रिक्षाचालकांनी मुदत समाप्तीनंतर नूतनीकरण केले नाही, त्यांनी कमी केलेले शुल्क भरून आपला परवाना कायम करावेत असे आवाहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी केले आहे.

Web Title: rickshaw permit renovation valu reduction in solapur