धूण्यासाठी आलेल्या कपड्यातील एक तोळ्याची अंगठी केली परत

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 17 मे 2018

मोहोळ (सोलापूर) - मोहोळ येथे लॉन्ड्रीचा व्यवसाय करणारे भारत मनोहर कोरे यांनी गिऱ्हाईकाच्या धुण्यासाठी आलेल्या कपड्यामध्ये आलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी संबधीत कपड्याच्या मालकाला बोलावून  परत दिल्याबद्धल भारत कोरे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

मोहोळ येथील आदर्श चौकात राहणारे भारत मनोहर कोरे यांचा शहरातीलच गवत्या मारूती चौकात लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. नगरसेवक संतोष खंदारे यांनी नेहमीप्रमाणे आपले कपडे धुण्यासाठी भारत कोरे यांच्याकडे दिले. भट्टीसाठी आलेले कपडे धुण्यासाठी तपासून पाठवित असताना कोरे यांना संतोष खंदारे यांच्या एका शर्टच्या खिशामध्ये सोन्याची एक तोळ्याची अंगठी निर्दशनास आली. त्यांनी त्वरीत खंदारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत दुकानात बोलावून घेतले.

त्यांच्या खिशात सापडलेल्या अंगठी बाबत खातरजमा करून त्यांची अंगठी त्यांना परत करण्यात आली. गवत्या मारूती चौकात सुमारे ८० वर्षापूर्वीपासुन भारत कोरे यांचे वडील कै. मनोहर, थोरला भाऊ कै. जयंत कोरे यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. वडील कै. मनोहर, थोरला भाऊ कै जयंत कोरे यांनी त्याकाळी  जपलेली प्रामाणिकता व कष्टाने प्रतिष्ठा प्राप्त करण्याची नैतिकता भारत कोरे या युवकांनेही जपली आहे. त्याबद्दल पंचायत समितीचे माजी उपसभापती शहाजहान शेख, नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, मंडप कॉन्ट्रक्टर  शहाजहान शेख (भाईजी), अशोक वस्त्रे,  नगरसेवक संतोष खंदारे, दत्ता खवळे, मुश्ताक शेख, नगरसेवीका शाहीन शेख यांनी अभिनंदन केले.

Web Title: ring in the cloth to wash