ऐsss परश्या.. बारावीची परिक्षा द्यायला आर्ची आली रे आर्ची 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या बारावीची परिक्षा देत आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आश्रम शाळा या परीक्षा केंद्रावरून ती बारावीची परीक्षा देत आहे. 

टेंभुर्णी- महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या बारावीची परिक्षा देत आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आश्रम शाळा या परीक्षा केंद्रावरून ती बारावीची परीक्षा देत आहे. 

या परीक्षा केंद्रावर रिंकू येत आहे असे कळताच तिच्या चाहत्यांनी शाळेबाहेर गर्दी केली. बारावीच्या परीक्षेसाठी येणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून या शाळेच्या संस्था चालकांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे अतिरिक्‍त पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. 

बारावीच्या परिक्षेला आजपासून सुरवात झाली आहे. सैराटनंतर रिंकू आता मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेल्या कागर या चित्रपटात दिसणार आहे. रिंकूने यापूर्वी वेळोवेळी डॉक्टर होण्याची व्यक्त केली आहे. त्यामुळे 12वी नंतर ती कोणत्या करिअरची निवड करतीये हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: Rinku Rajguru to give HSC exam in tembhurni