शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे; रासायनिक खतांचे दर भिडले गगनाला

शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे; रासायनिक खतांचे दर भिडले गगनाला

नवेखेड (सांगली) : सलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे लॉकडॉऊनचा फटका प्रमुख्याने शेतीमालाला बसत आहे. कवडीमोल दराने शेती उत्पादनाची विक्री होत असताना. रासायनिक खत दराच्या पन्नास किलोच्या गोणीमागे ४०० ते ७००रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही वाढ अन्याकरक असल्याची शेतकरी वर्गाची भावना आहे. कोरोनाचा सलग दोन वर्षे शेतीला मोठा फटका बसला. फळे, फुले, भाजीपाला त्याचबरोबर इतर शेतीउत्पादनाची कवडीमोल दराने शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

Rising prices of chemical fertilizers farmers agriculture marathi news

अनेकांनी काढणी अंगावर आल्याने तो जमिनीत गाडला.आशा विचित्र परस्थितीमधून शेती व शेतकरी जात असताना खरिपाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खत कंपन्यांना दिले जाणारे अनुदान बंद केल्याने रासायनिक खतांची दरवाढ झाल्याचे यातील जाणकारांनी सांगितले.मागील दोन महिन्या पूर्वी खतांच्या वाढीव दराची माहिती एका कंपनीच्या अंतर्गत पत्रव्यहरतून माध्यमासमोर आली.केंद्र सरकारने यावर खुलासा करत ही दरवाढ नाही असे सांगितले.पुढे लगेच महिनाभरात ही अव्वाच्या सव्वा दरवाढ केली यामध्ये इफको,म्हाधन,आय पीएल,जीएस एफसी यासह अनेक नामवंत कंपन्यानी ही दरवाढ केली आहे.

रासायनिक खत तयार करण्यासाठी च्या कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने व केंद्र सरकारने खत कंपन्यांचे अनुदान बंद केल्याने ही दरवाढ झाल्याची चर्चा आहे. या दरवाढीमुळे पिकांचा उत्पादन खर्च अचानक वाढला आहे. तुलेनंत मिळणारा दर अत्यल्प राहिल्याने शेती ही न परवडणारी गोष्ट झाली आहे.अलीकडे सर्वच जमिनीची सुपीकता कमी झाल्याने रासायनिक खत मात्रा देण्याशिवाय लोकांच्यात पर्याय नाही.

वाढलेले दर असे

खताचा प्रकार जुने दर नवे दर

इफको

१०:२६:२६ ११७५ १७७५

१२:३२:१६ १२३५ १८००

२०:२०:० ९७५ १३५०

डी ए पी ११८५ १९००

आय पी एल

डी ए पी १२५० १९००

२० :२०:० ९७५ १४००

पोटॅश ८५० १०००

महाधन

१०:२६:२६ १२७५ १९२५

२४:२४:० १३५० १९००

२०:२०:१३ १०५० १६००

एकीकडे शेतकऱ्यांना पेन्शन आणि दुसरीकडे खताची दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे.

बी. जी. पाटील, शेतकरी नेते बळीराजा शेतकरी संघटना

या दरवाढीत केंद्र व राज्य सरकारचा समनव्य नाही.खत कंपन्यांची मनमानी सुरु आहे.महिनाभरात दोनवेळा दरवाढ केली आहे.खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

बिभीषण पाटील,शेतकरी बावची

Rising prices of chemical fertilizers farmers agriculture marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com