रितेश देशमुखने फोडली बालगोपालांसह दहीहंडी

Dahihandi
Dahihandi

खंडाळा (जि. सातारा) - प्रसिद्ध चित्रपट अभिनेता रितेश देशमुख याने शिवाजीनगर (ता. खंडाळा) येथे सोमवारी दहीदंडी उत्सवात भाग घेतला. त्याच्या उपस्थितीने शालेय मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता.

चित्रपटांत अनेक वेळा पाहिलेला अभिनेता चक्क आपल्याबरोबर प्रत्यक्ष दहीहंडीत भाग घेणार असल्याने शिवाजीनगर प्राथमिक शाळेतील मुलांना मिळाल्याने सर्वांनी एकच जल्लोष केला. "विठू माउली टू' या मराठी चित्रपटासाठी सध्या शिवाजीनगर येथे मोठा सेट उभारण्यात आला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रितेश देशमुख आला होता. शाळेत बालचमूंची दहीहंडी सुरू असल्याचे समजल्यावर रितेश येथे पोचला. बालगोपालांबरोबर सहभागी होऊन त्याने दहीहंडी फोडली. यावेळी मुख्याध्यापक छाया यादव, शिक्षक महादेव यादव, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर (ता. खंडाळा) - प्राथमिक शाळेतील बालचमूंबरोबर सोमवारी दहीहंडी फोडल्यानंतर जल्लोष करताना अभिनेता रितेश देशमुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com