सोलापूरची ऋतुजा भोसले दुहेरीत उपांत्य फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

अंकिता रैनाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश 
अंकिता रैना हिने भारताच्याच रिया भाटिया हिचा सहज परावभ करत एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. रैनाने हा समान 6-3, 6-4 जिंकला असला तरी रियाने तिला कडवी झुंज दिली. अंकिताने आपल्या अनुभवाच्या जोरावर रियाला सामन्यात परतूच दिले नाही. तिची प्रत्येक सर्व्हीस अंकिताने भेदली. 

सोलापूर : प्रिसिजन जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत दुहेरीत सोलापूरच्या ऋतुजा भोसले हिचा खांदा दुखत असतानाही कडवी झुंज देत तिने उपांत्य फेरी गाठली. तर, भारताच्या अंकिता रैनाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

कुमठा नाका येथील लॉन टेनिस कोर्टवर प्रिसिजन सोलापूर ओपन वूमन्स आयटीएफ टेनिस टुर्नामेंट' स्पर्धा सुरू आहेत. दुेहेरीत ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या वेबली स्मिथ एमिली हिच्या जोडीने थायलंडच्या पुन्नीन कोवापिटुकटेड (थायलंड) आणि सवंगकाएव (थायलंड) या जोडाचा 7-5, 6-4, 10-8 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. सामन्याच्या सुरवातीपासून तिचा खांदा दुखत होत होता. पहिला सेट अतिशय चुरशीचा झाला. ऋतुजाकडून 7-5 असा पहिला सेट गेला. ऋतुजा व एमिलीच्या भेदक सेर्व्हिसमुळे थायलंडच्या खेळाडूंचा निभाव लागला नाही. तिसरा सेटही अतिशय चुरशीचा झाला. हा सेट 20 मिनिटाचा झाला. शेवटी हा सेट ऋतुजाने 10-8 असा जिंकला. 

हेही वाचा : कुस्तीगीर परिषदेचा आखाडाही शरद पवारांनीच जिंकला! 

एकेरीची मुख्य फेरी 
अंकिता रैना (भारत) वि. वि. रिया भाटिया (भारत) 6-3, 6-4, सार्विख्या व्हॅलेरिया (रशिया) वि. वि. चेंगीझ बेर्फु (टर्की) 6-4, 7-6 (5), नैकिता बेन्स (ग्रेट ब्रिटन) (5) वि. वि. वैदेही चौधरी (भारत) 6-7 (5), 6-3, 6-1, युई युआन (चीन) वि. वि. जेनिफर लुईखम (भारत) 6-4, 6-4, सॅन्ड्रा समीर (इजिप्त) वि.वि. मनाचाया सवंगकाएव(थायलंड) 6-3, 6-2, कॅटी बोल्टर (ग्रेट ब्रिटन) वि.वि. एम्मा राडुकानु 6-2, 2-1 (सामना सोडला दुखापत), डायना मार्चिकेविचा (लेटव्हिया) वि.वि. डारिया मिशिना (रशिया) 6-3, 6-4, ऐकरी अलरिके (नॉर्वे) वि.वि. ख्रिस्ती फ्रेया (ग्रेट ब्रिटन) 7-5, 6-2. 

हेही वाचा : गब्बरला टीममेट्‌सने दिल्या अशा भन्नाट शुभेच्छा 

दुहेरीचा निकाल 
ऋतुजा भोसले (भारत ) आणि एमिली वेबली स्मिथ (ग्रेट ब्रिटन ) वि. वि. कोवापिटुकटेड पुन्नीन आणि सवंगकाईं मनाचाया (थायलंड ) 5-7, 6-4, 10-8, सॅन्ड्रा समीर (इजिप्त ) आणि एकत्रिना यशीना (रशिया ) वि. वि. डारिया मिशिना (रशिया ) आणि ऍना मोरगिना (रशिया ) (3) 6-1 6-4, अंकिता रैना (भारत ) आणि ऐकेरी उलरिक्के (नॉर्वे) वि. वि. प्रतिभा नारायण आणि सोहा सादिक (भारत ) 6-1, 6-1, बेर्फु चेंगीझ (टर्की ) आणि देस्पिना पापामिचेल (ग्रीस ) वि. वि. झोऊमा निमा आणि युई युआन (चीन ) 6-3 6-4. 

स्पर्धेतील क्षणचित्रे 

Image may contain: one or more people and people playing sports

Image may contain: people playing sports and tennis

Image may contain: 2 people, people playing sports and tennis

Image may contain: 1 person, playing a sport and tennis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rituja Bhosale semifinal in doubles