ऋतुराज यादव या विद्यार्थ्यांचा लघुपट राष्ट्रीय पातळीवर प्रथम    

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

उंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला, लघुपट, निबंध स्पर्धेत ऋतुराज जयवंत यादव याने बनविलेल्या लघुपटास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे.          

ऋतुराज हा संजीवन नॉलेज सिटी पन्हाळाचा विद्यार्थी असुन, देशभरातील ३५० शाळा़ंमधुन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधुन त्याने प्रथम येताना आपल्या लघुपटातुन प्लास्टिकच्या पुनर्वपरावर सुंदर उपाय सुचवले आहेत. यासाठी त्याला कला शिक्षक गावडे सर यांचे मार्गदर्शन तर संजीवन संस्थेचे पाठबळ मिळाले आहे. 

राष्ट्रीय बक्षीस वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे संप्पन झाला. त्यात ऋतुराज याला रिलायन्स उद्योगाचे पॉलिमर चेनचे अध्यक्ष श्री अजय शहा यांचे हस्ते गौरविण्यात आले. त्याने बनविलेल्या लघुपटाचे यावेळी मन्यवरांनी कौतुक केले.                 

ऋतुराज हा मुळचा उंडाळे गावचा असुन, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव श्री बी. आर यादव सर यांचा नातू आहे. या निवडीबद्दल त्याचे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील, राहूल डिस्टीबुटसचे मालक वसंतराव चव्हाण, मोहनराव चव्हाण, भिमराव पाटील, शेवाळेवाडी व उंडाळे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rituraj Yadav's short film at the national level