बिल अदा करण्यापूर्वीच रस्ता झाला नादुरुस्त

Road
Road

मंगळवेढा - तालुक्यातील मरीआई चौक ते सलगर बुद्रुक रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या रस्त्याचे काम नुकतेच केले असून कामाचे बिल अदा करण्यापूर्वी हा रस्ता नादुरुस्त झाला. याकडे संबंधित खात्याने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची दैना झाली. 

मंगळवेढा -खोमनाळ -सलगर बुII या खराब झालेल्या रस्त्यासाठी आ. भारत भालके व आ. प्रशांत परिचारक यांनी निधी उपलब्ध केला. पण या खराब रस्त्याची सुरूवात मंगळवेढ्यापासून होत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने मरिआई चौक ते सलगर बुII या रस्त्याची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. लवंगी येथे जलसंधारणमंत्री आ. तानाजी सावंत यांचा भैरवनाथ शुगर खासगी कारखाना असून या कारखान्याकडे ऊस गाळप हंगामात या रस्त्यावरून वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त मंगळवेढ्यापासून दुरूस्तीसह रूंदीकरण करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार करून देखील या खात्याने दुर्लक्ष केले. तर या रस्त्याच्या निधी याच रस्त्यावर इतर ठिकाणी वापरत या रस्त्याची दुरूस्ती दोन ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. पण मंगळवेढ्यापासून हिवरगाव पाटी पर्यंत मात्र दुर्लक्ष केले. त्यापैकी मध्ये मरिआई चौक ते सलगर बुII या रस्त्यावर सध्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. परंतु या रस्त्याचे काम सुरू असताना या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याच्या कामाचे बिल करण्यापूर्वी हा रस्ता खराब झाला. सामाजिक कार्यकर्ते नारायण गोवे व लेबर फेडरेशन संचालक सरोज काझी यांनी लेखी तक्रार दिली आहे.

पुढील महिन्यात महिन्यापासून कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होत असल्यामुळे हा रस्ता आणखीनच खराब होणार आहे त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोठ्या वाहनांबरोबर बरोबर दुचाकी व दुचाकी व त्याचा सामना करावा लागणार आहे परंतु बांधकाम खाते मात्र या मार्गावरून लोकांची गैरसोय कशी होईल याकडे अधिक लक्ष देत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या खात्यामधील अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठेकेदाराला सूचना करणे म्हणजे हे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे आता ठेकेदारावर कोणती कारवाई करणार याकडे देखील या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याचे काम ठेकेदाराने निकृष्ट केले. या कामाचे बिल अदा करण्यापूर्वी ही रस्त्याची अवस्था तर भविष्यात हा रस्ता टिकण्याची शाश्वती नाही त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला. कामाची क्वालिटी कंट्रोल कार्यालया मार्फत चौकशी करावी तरी देखील या ठेकेदाराला नवीन कामे देण्याचा प्रयत्न शासकीय अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे.
- सरोज काझी. संचालक लेबर फेडरेशन

या रस्त्यावरील कामाची बिलाची एम. बी.रेकॉर्डिंग केले नाही. रस्ता खराब झालेल्या ठिकाणी दुरुस्त करण्याच्या  सूचना ठेकेदारांना दिल्या. त्यानंतर त्याचे बिल जे होईल ते बिल अदा केले जाईल. 
- पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com