अभिनव पद्धतीने कोन्हेरीत हुतात्म्यांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी अडचणीचा असणारा रस्ता स्वखर्चाने भरून घेऊन, रस्त्यावर अडथळा होणाऱ्या साइडपट्टीवरील काटेरी झुडपे काढून व खाऊ वाटप या सामाजिक उपक्रमाद्वारे हुतात्म्यांना अभिवादनचा अतिशय स्तुत्य उपक्रम कोन्हेरी (ता. मोहोळ) येथे राबविण्यात आला. 

मोहोळ (जि. सोलापूर) : शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी अडचणीचा असणारा रस्ता स्वखर्चाने भरून घेऊन, रस्त्यावर अडथळा होणाऱ्या साइडपट्टीवरील काटेरी झुडपे काढून व खाऊ वाटप या सामाजिक उपक्रमाद्वारे हुतात्म्यांना अभिवादनचा अतिशय स्तुत्य उपक्रम कोन्हेरी (ता. मोहोळ) येथे राबविण्यात आला. 
कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील डायमंड सामाजिक संस्थेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना अभिवादनाचा कार्यक्रम अवांतर खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे उद्‌घाटन गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांच्या हस्ते करण्यात आले.

वार झाला मुंबईत जखम झाली दिल्लीत

या वेळी माजी सरपंच भीमराव जरग, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रामचंद्र शेळके, लोकनेते शुगरचे संचालक बाळासाहेब शेळके, सरपंच गणेश पांढरे, आबाराव जरग, अंकुश जरग, भगवान शेळके, सुभाष जरग, भास्कर शेळके, महेश माळी आदी उपस्थित होते. 
डायमंड सामाजिक संस्थेच्या वतीने स्वखर्चातून गाव ते जरग वस्ती, पापरी रस्ता, चिखली रस्ता येथील पूर्णपणे काटेरी झुडपे काढून साफसफाई करण्यात आली. शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी होणारा नेहमीचा त्रास पाहून शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता एक किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्यातील या आमदारांनी घेतली शपथ

या वेळी अध्यक्ष नीलेश जरग, उपाध्यक्ष विनायक डोंगरे, राजकुमार शेळके, देविदास देवकते, आनंद शेळके, सर्जेराव जरग, प्रवीण शेळके, नितीन जरग, बाळासाहेब शेटे, अमोल जरग, कैलास शेळके, भुजंग माने, अजिंक्‍य कांबळे, नितीन माने, नितीन कौलगे, सुजित शेळके, बाळासाहेब भोसले, बालाजी चव्हाण, पोपट शेळके, योगेश जरग, मारुती माने, राहुल शेळके, विष्णू शेळके, सज्जन पांढरे, शहाजी जरग, बिभीषण शेळके, गणेश जरग, संजय लवटे, नारायण शेळके यांनी पुढाकार घेऊन परिश्रम केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road repairing in konheri