मोहोळ: रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान

Road safety awareness campaign in mohol
Road safety awareness campaign in mohol

मोहोळ - जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढल्याने अपघातात ही वाढ झाली आहे. अपघात स्वतःला झाल्यावरच त्याची दाहकता कळते. अपघात समयी मदत केल्यास तो गोल्डन आवर होईल आपापल्या कर्तव्याची जाणिव करून घ्या, असे प्रातिपादन आरएसपी चे महासमादेशक अरविंद देशमुख यांनी केले.
       
4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा पोलीस आधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्याचा समारोप येथील नागनाथ विद्यालयात करण्यात आला. त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रमुख श्रीमती कुरे, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सहायक पोलीस निरीक्षक एस सी बिराजदार, पोलिस उपानिरीक्षक मिना मरे, के डी पानसांडे, नागनाथ विद्यालयाचे प्रा बशीर बागवान सर्व शिक्षक, हवालदार लाईने एच एम, एस के घुगे, एस एम कोळी, ए आर काळे, अमोल माने, हवालवार अरब, जयश्री गायकवाड उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा वाहतुक प्रमुख कुरी म्हणाल्या, जिल्ह्यात रस्ता सुरक्षेविषयी प्रात्यक्षीकासह पथनाट्य सादर केली आहेत. अपघातात मृत्युचे प्रमाण जिल्ल्यात जास्त आहे. विद्यार्थ्यांनी आता गावातील सर्वे करून हेलमेट सक्ती करावी, जिल्ह्यात 67 महाविद्यालयात प्रबोधन केले आहे.

पोलीस निरीक्षक कोकणे म्हणाले 108 व 100 नंबर ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने कर्तव्याची अंमलबजावणी केली तर अधिकार मागण्याची गरज राहणार नाही. यावेळी शिवाजी चौकात अपघाताचे प्रात्यक्षीक, पथनाट्य व अपघात समयी करावयाच्या उपाय योजनांची प्रात्यक्षीके करण्यात आली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com