रस्ता सुरक्षा पंधरवड्याची सुरवात सोमवारपासून 

रस्ता सुरक्षा पंधरवड्याची सुरवात सोमवारपासून 

कोल्हापूर - "आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या' या ब्रीदवाक्‍यासह 28 व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरवात सोमवार (ता. 9) पासून केली जाणार आहे. याचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यात 9 ते 23 जानेवारीअखेर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस दल यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळा... याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, विविध रिक्षा, बस, ट्रक संघटना आदी ठिकाणी शिबिरे घेऊन प्रबोधनाची व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यावर जाऊन तेथील चालकांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच वाहनांना रिफ्लेक्‍टरही लावण्यात येणार आहेत. या अभियानाची सुरवात सोमवारी (ता. 9) सकाळी नऊ वाजता होणार आहे. याप्रसंगी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित राहणार आहेत. 

कोल्हापूर विभागात साधारणतः 26 लाख 65 हजार इतकी वाहनांची संख्या आहे. कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यांत 2015 मध्ये 2805 अपघात झाले. त्याचे प्रतिदिन सरासरी प्रमाण 7.68 टक्के इतके आहे. या अपघातात 770 लोकांचा मृत्यू झाला. त्याआधारे प्रतिदिन दोघांचा मृत्यू तर आठ जण जखमी होण्याचे प्रमाण असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

राज्यातील अपघाताचे प्रमाण 
वर्ष अपघात मृत जखमी 
2013 61,890 12,194 39,606 
2014 61,627 12,803 40,455 
2015 63,805 13,212 39,606 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com