रस्त्यांच्या दुतर्फा टेकड्या होणार हिरव्यागार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

कऱ्हाड - राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या टेकड्या हिरव्यागार करण्यासाठी सामूहिक ठोस वनरोपण शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी चार कोटी २७ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील टेकड्यांचे हरीतकरण करण्यात येणार आहे. 

कऱ्हाड - राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या टेकड्या हिरव्यागार करण्यासाठी सामूहिक ठोस वनरोपण शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी चार कोटी २७ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील टेकड्यांचे हरीतकरण करण्यात येणार आहे. 

वृक्ष लागवड व संवर्धन योजनेंतर्गत सामुदायिक वृक्षारोपण होणार आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी सहा कोटी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी नऊ महिन्यांच्या कालवधीसाठी म्हणजेच डिंसेबर २०१८ अखेर चार कोटी २७ लाखांचा निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा जून ते डिसेंबर २०१८ अखेर चार कोटी २७ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

२०१५-१६ पासून निधी देण्यात येत आहे. मात्र, यंदा त्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यासाठी नऊ महिन्यांचा कालवधी गृहीत धरून वरील निधी देण्यात आला आहे. तो त्याच कालवधीत वितरित करून टेकड्यांचे हरितीकरण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. योजनेंतर्गतचा खर्च वनीकरण व वन्यजीव यावरील भांडवली खर्च, सामूहिक ठोस वनरोपण व टेकड्यांच्या हरितीकरणासाठी अपेक्षित आहे. 

योजनेंतर्गत जिल्हानिहाय खर्च होणारा निधी, त्याच्या तरतुदीची माहिती व राबवलेल्या कार्यक्रमाची माहिती प्रत्येक महिन्याला कळवणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी ‘सोशल मीडिया’चाही वापर करण्याच्या सूचनाही शासनाने दिलेल्या आहेत. 

...असा होणार खर्च 
महत्त्वाच्या रस्त्याच्या दुतर्फा येणाऱ्या टेकड्यांच्या हरितीकरणासाठी प्रत्यक्षात सहा कोटी दहा लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र जून ते डिसेंबर २०१८ अखेर चार कोटी २७ लाख रुपये मंजूर आहेत. त्यात प्रत्येक महिन्याला ६१ लाख रुपये हरितीकरणासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. त्यात ३६ लाख ६० हजार रुपये मजुरी आणि पुरवठा व सामग्रीसाठी २४ लाख ४० हजारांचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: road side hill tree plantation