शिराळा पावसाच्या पाण्याने चिखलमय

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 12 जुलै 2018

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरण परिसरात २४ तासात ७४ मी. मी. पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली आहे.

शिराळा - पावसामुळे कापरी नाका परिसरातील चिखलमय झालेल्या रस्त्यामुळे लोकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरण परिसरात २४ तासात ७४ मी. मी. पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली आहे. शिंदेवाडी येथील पाझर तलाव भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. शिराळा येथील कापरी नाक्याजवळील वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

गेले दोन दिवसापासून शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस कोरडे पडलेले ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तालुक्यातील पाझर तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. कापरी नका परिसरातील वसाहतीमध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्ता झाली असल्याने या रस्त्यावरून चालताना लोकांना चिखलातून चालावे लागत आहे.

मंडल निहाय झालेला पाऊस व कंसात एकूण
शिराळा-२५  (३२६)
शिरशी- २९ ( ३२४)
मांगले- १६ (२९३)
कोकरूड- ३६ (४६७)
चरण- ४४(५८६)
सागाव- २५ (३४३)
वारणावती- ७४ (१०७८)
धरणपातळी- ६९६.७९० मीटर
एकूण पाणीसाठा- ६७४.९९८ द.ल.घ.मी.
टीएमसी- २३.८४
टक्केवारी- ६९.२९

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Roads in Shirala is closed with rain water