माजीमंत्री खानविलकरांच्या कंपाऊंडमध्ये चोरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या नागाळा पार्क येथील बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या 30 हजार रूपये किमंतीच्या मोटारीच्या बॅटऱ्या चोरट्याने लंपास केल्या. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद भगवान भाऊ पाटील (वय 54, चौथा बस स्टॉप, फुलेवाडी) यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, भगवान पाटील हे खासगी सचिव म्हणून काम करतात. त्यांनी मोटारीच्या 30 हजार रुपये किमंतीच्या बॅटऱ्या माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या बंगल्या खालील कंपाऊंडच्या रिकाम्या जागेत शुक्रवारी (ता.16) ठेवल्या होत्या. चोरट्याने कंपाऊडमध्ये प्रवेश करून या बॅटऱ्या चोरून नेल्या. काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पाटील यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात 30 हजार रूपये किमंतीच्या बॅटरी चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली. परिसरातील सीसी टीव्ही आधारे पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in Ex minister Khanvilkar house compound