खानापूरमध्ये भरवस्तीत ७ लाखांची धाडसी चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

खानापूर - येथील गुहागर-विजापूर रस्त्यालगत असलेल्या भरवस्तीत सागर दुर्योधन गायकवाड यांच्या राहत्या घरी कुटुंब बाहेर गावी गेले असता अज्ञातांनी दरोडा टाकून ७ लाखांची धाडसी चोरी केली. दरोड्याची घटना दोन दिवसांनी उघडकीस आली.

खानापूर - येथील गुहागर-विजापूर रस्त्यालगत असलेल्या भरवस्तीत सागर दुर्योधन गायकवाड यांच्या राहत्या घरी कुटुंब बाहेर गावी गेले असता अज्ञातांनी दरोडा टाकून ७ लाखांची धाडसी चोरी केली. दरोड्याची घटना दोन दिवसांनी उघडकीस आली.

पोलिसांनी माहिती दिली, की सागर गायकवाड हे कुटुंबासह पुणे येथे नवीन घरी साहित्य स्थलांतरित करण्यास गेले होते. ८ ऑगस्टला त्यांच्या शेजारी मंगल डोंगरे यांनी घराचा दरवाजा तुटल्याबाबत माहिती दिली.  सकाळी गायकवाड कुटुंबाने घरी येऊन खात्री केली. त्यांना घरासमोरील दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा स्क्रू ड्रायव्हरने उचकटून तिजोरीतील सोन्याचे ४०० ग्रॅम व चांदीचे तीन किलोचे दागिने असा ७ लाख १ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसले.

बाजारभावाप्रमाणे दागिन्यांची किंमत १४ लाख होते. सोमवारी किंवा मंगळवारी चोरीची घटना झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चोरीची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञ पथकाने तपास करून माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपाधीक्षक अमरसिंह नलवडे व पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब सावंत, संतोष घाडगे आदी तपास करीत आहेत. दरम्यान, चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Robbery incidence in Khanapur