जत तालुक्यातील दरोडाप्रकरणी सराफासह तिघे जेरबंद

जत तालुक्यातील दरोडाप्रकरणी सराफासह तिघे जेरबंद

सांगली - माडग्याळ (ता. जत) येथील जत-चडचण रस्त्यालगत असलेल्या बीअरबारमध्ये दरोडा टाकणाऱ्यांनीच शेगाव (ता. जत), कुरळप, ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली. याप्रकरणी सराफासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सराफ मंजुनाथ गुरुनाथ वेरणेकर (वय २८, दत्तमंदिराजवळ, रायबाग, बेळगाव), शिवाजी उत्तम काळे (वय ४२, गडमुडशिंगी, कोल्हापूर) आणि आकाश आप्पा चव्हाण (वय २०, उमराणी रोड, जत) अशी त्या तिघांची नावे आहे. त्यांच्याकडून अकरा तोळे सोन्यासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

यापूर्वी दत्तात्रय रामू चव्हाण (वय २८) आणि दिगंबर रामू चव्हाण (वय २५, दोघेही रा. उमराणी रोड पारधी तांडा, जत) या दोघांना पोलिसांनी अटक  केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. ही आंतरराज्य टोळी असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार बैठकीत  दिली. 

माडग्याळ (ता. जत) येथील जत-चडचण रस्त्यालगत बीअरबारमध्ये सोमवारी (ता. ११) कुलूप तोडून बारमालक आणि कामगारांना मारहाण करून चोरट्यांनी दारूचे बॉक्‍स व रोख रक्‍कम असा दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या परिसरात गस्तीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या  पथकाला भरधाव जाणाऱ्या जीपचा संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. तेव्हा जीपमधील दरोडेखोरांनी दारूच्या बाटल्या फेकल्या. अखेर कोळगेरीजवळ जीप पलटी झाली. त्यावेळी दत्तात्रय चव्हाण आणि दिगंबर चव्हाण यांना अटक केली. अन्य तिघे पसार झाले.

पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली. तसेच जत, उमदी, अथणी, कागवाड भागात तपास यंत्रणा राबवली. टोळीतील दोघे सोने विक्रीसाठी रायगबाग (बेळगाव)  येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने सापळा रचून सराफ वेरणेकरसह काळे यास अटक केली. त्यांचा साथीदार आकाश चव्हाण यालाही अटक केली. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके, सहायक निरीक्षक विशाल पाटील, अमितकुमार पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. 

या टोळीचे दरोडे

  •     २१ नोव्हेंबरला पहाटे तीनच्या सुमारसा शेगाव (ता. जत) येथील साहेबराव विठ्ठल शिंदे यांना मारहाण करून रोख तीन लाखांसह सोन्याचे दागिने असा चार लाख ९० हजारांचा मुद्देमाल लुटला.
  •     १७ मे रोजी कुरळप (ता. वाळवा) येथील सुशीला आनंदा कांबळे यांना मारहाण करून चाकूच्या धाकाने सात तोळे दागिने लंपास. 
  •     ३० मे रोजी ऐतवडे खुर्द येथील प्रकाश सूर्यवंशी यांच्या दरवाज्यावर दगड घालून दागिन्यांसह पन्नास हजारांचा मुद्देमाल पळवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com