कऱ्हाडमध्ये चारचाकीसह, एलईडी टिव्ही, पेनड्राईव्ह चाेरीस

सचिन देशमुख
गुरुवार, 19 जुलै 2018

कऱ्हाड : शहरालगतच्या गजानन हौसिंग सोसायटीमधील चारचाकीसह बंद घरातून 42 इंची एलईडी टिव्ही, अडीच हजारांची रोकड, पेन ड्राईव्ह तसेच अन्य ऐवज चोरीस गेले अाहेत. ही घटना अाज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. दरम्यान चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह अन्य रोख रक्कम चाेरीस गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

गजानन सोसायटीतील गणपती मंदिराकडून एमएसईबीकडे जाणाऱ्या मार्गावर सचिन प्रल्हाद जाधव यांचा बंगला आहे. जाधव इलेक्ट्रीशन कंत्रादार आहेत. ते पुण्याला गेले होते, त्यांच्या पत्नीही आजीचे ऑपरेशन आल्याने काल (बुधवार) पुण्याला गेल्या. अकरावीत शिकणारा त्यांचा मूलगा अनिकेत घरी एकटा होता. काल सायंकाळी सहापर्यंत घरात थांबून तो कऱ्हाड शहरातील त्यांच्या मामाकडे मुक्कामासाठी गेला. आज (गुरुवार) सकाळी तो तेथूनच क्लासला गेला. मात्र क्लासला सुट्टी असल्याने तो गजानन सोसायटीतील घरी आला. तेव्हा घराचे गेट तसेच दरवाजा उघडा दिसला. त्याने अात पाहिले असता चाेरी झाल्याचे लक्षात अाले. त्यावेळी 42 इंची एलईडी टिव्ही, इंडीका व्हस्टा (एमएच 50- 0904) गाडीही चोरट्यांनी लंपास केली हाेती.

याबाबतची माहिती त्याने पोलिसांना दिली. गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ठसे तज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. ठिक ठिकाणच्या मार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरेही तपासण्याचे काम सुरू आहे.

Web Title: robbery in karhad tv pen drive four wheeler stolen