महाराष्ट्र बँकेच्या शेणोली शाखेवर दिवसाढवळ्या दरोडा

robbery at Maharashtra Banks Shenoli branch
robbery at Maharashtra Banks Shenoli branch

रेठरे बुद्रुक : महाराष्ट्र बँकेची शेणोली (तालुका कराड) येथील शाखा रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गोळीबार करत दिवसाढवळ्या लुटल्याचा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. चारचाकी गाडीतून आलेल्या सुमारे चार ते पाच जणांनी संबंधित शाखेतील रोख रक्कम आणि सोने लुटूनन नेले असून या घटनेमुळे पोलिसांनी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे.          

महाराष्ट्र बँकेची शेनोली स्टेशन येथे शाखा आहे. आज सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका चारचाकीतून आलेल्या सुमारे चार ते पाच जणांनी बँकेमध्ये प्रवेश करून बँकेत उपस्थित असणारे खातेदार आणि बँकेचे कर्मचारी यांचे मोबाईल काढून घेतले. त्यानंतर त्यांनी संबंधितांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि सोने चोरून नेले. त्यांनी खातेदार व बँकेतील कर्मचाऱ्यांचे मोबाईल घेऊन पलायन केले आहे. जाताना त्यांनी बँकेच्या दाराला बाहेरून कडी लावल्यामुळे हा प्रकार लगेच लक्षात आला नाही.

काहीवेळाने ग्रामस्थांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तालुका पोलीस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. दरम्यान या दरोड्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्याच्या हद्दीवर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com