बंद फ्लॅट फोडून भरदिवसा कोल्हापूर येथे 28 तोळे दागिने लंपास 

राजेश मोरे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कोल्हापूर - शिरोली टोल नाक्‍याजवळील बंद फ्लॅट भरदिवसा चोरट्याने फोडून सुमारे 28 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद वैशाली प्रदीप भोसले (वय 47, रा. चैतन्य अपार्टमेंट शिरोली टोल नाक्‍याजवळ) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वैशाली भोसले यांचे वडील शिवाजीराव पाटील यांचा शिरोली टोल नाक्‍याजवळील चैतन्य अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये त्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांची बहिण मुक्त सैनिक वसाहत येथे राहते. त्यांच्या घरी लग्न कार्य होते. त्या कार्यासाठी त्यांनी सोन्याचे दागिने घरी आणून ठेवले होते. काल सकाळी अकराच्या सुमारास त्या मुलग्यासोबत बहिणीकडे गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा चोरट्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील दोन कपाटे उचकटून त्यातील साहित्य विस्कटले.

त्यावेळी त्याच्या हाती सुमारे 28 तोळे सोन्याचे दागिने हाती लागले. काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात 4 लाख 67 हजार रूपये चोरीची नोंद झाली. 

Web Title: Robbery in Shiroli Naka region