‘इंडियन इंजिनिअरिंग’मध्ये रोहन पाटील राज्यात प्रथम

‘इंडियन इंजिनिअरिंग’मध्ये रोहन पाटील राज्यात प्रथम

कोल्हापूर - ‘सातत्याने प्रयत्न करत राहिलो. अभ्यासाचे उत्कृष्ट नियोजन करून त्यादृष्टीने वाटचाल केली. पहिल्याच प्रयत्नात इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये राज्यात प्रथम, तर भारतात ४४ वा क्रमांक मिळविला.’ अर्थात ही यशोगाथा आहे, पेठवडगाव येथील रोहन रामराव पाटील याची.

रोहन म्हणतो, ‘‘यूपीएससी ही परीक्षा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार अभ्यासास प्रारंभ केला. जानेवारीत पहिली प्री-लिम ५०० मार्कांची होती. यासाठी २५ विषय होते. मुख्य परीक्षा ही जुलैमध्ये झाली. यात १५ विषयांचा समावेश होता; तर सप्टेंबरमध्ये मुलाखत झाली. याकरिता २०० गुण होते.

नोव्हेंबरमध्ये अंतिम निकाल आला. अंतिम निकाल आल्यानंतर मी राज्यात प्रथम तर देशात ४४ वा क्रमांक मिळविला. त्याआधी मी २०१४ मध्ये बी. ई. (इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन) इंजिनिअरिंग थदोमल शहानी इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबईमध्ये पास झालो. कॉलेजला शेवटच्या वर्षात असतानाच मला नोकरी मिळाली. यानुसार मी बंगळूर, मुंबईत नोकरी केली; मात्र नोकरी करत असतानाच आई सौ. रंजना पाटील, वडील रामराव पाटील यांची इच्छा होती, की अजूनही पुढील शिक्षण पूर्ण करावे.

माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक तर आयआयटीमध्ये एम.टेक्‌. करायचे. दुसरे म्हणजे, यूपीएससी करायची. इंजिनिअरिंग क्षेत्र हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे, म्हणून मी यूपीएससीचा पर्याय स्वीकारला. याकरिता मी जुलै २०१५ मध्ये दिल्लीला अभ्यासासाठी गेलो. तिथे मेड इझी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. बी. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

दररोज आठ तास अभ्यास केला. त्याआधी मी ‘इस्रो’च्या परीक्षेसाठी तयारी केली. यामध्ये पेपरही दिला. मुलाखत दिली. यातही मी यशस्वी झालो, तरीही मला भारताच्या प्रगतीसाठी इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करायला आवडेल.’’

दरम्यान, रोहनचे प्राथमिक शिक्षण शारदा विद्यामंदिर तर दहावीचे शिक्षण वडगाव हायस्कूलमध्ये झाले. ११ वी, १२ वी विवेकानंद कॉलेजमध्ये झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com