पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी रोहिदास सातपुते पोलिसांना शरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नगर - महानगरपालिकेच्या बहुचर्चित 34 लाख रूपयांच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अभियंता रोहिदास सातपुते अखेर आज पोलिसांना शरण आला. या प्रकरणी त्याच्यावर पूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 

चौतीस लाख रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी सातपुते साडेतीन महिन्यांपासून पसार होता. त्याच्या विरोधात स्टॅंडिंग वॉरंटही जारी करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दोन दिवसांत हजर न झाल्यास संपत्तीवर टाच आणण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळीच सातपुते पोलिसांना शरण आला. 

Web Title: Rohidas Satpute surrenders to the main accused in the Pathdiive scam