भारताची निवडणूक प्रक्रिया जगाला सांगणार सोलापुरची रोहिणी

अक्षय गुंड  
रविवार, 21 जुलै 2019

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या निवडणुक प्रकीयामध्ये सेलम जिल्ह्याची पहिली महिला निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला अभिमान वाटतो. जगासमोर वृत्तवाहिन्याच्या माध्यामातुन देशातील निवडणुक प्रकीया सांगण्याची संधी म्हणजे सेलममधिल कामाची पोचपोवती आहे. 
- रोहिणी भाजीभाकरे-बिदरी, जिल्हाधिकरी सेलम (तामिळनाडू)

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापुर) : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची लोकसभा निवडणुका प्रकिया कशा प्रकारे पार पडतात. हे नॅशनल जिओग्राफी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या माध्यामातुन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ता.१५ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी १ वाजता "द ग्रेट इंडियन इलेक्शन" या माहितीपटातुन संपुर्ण जगाला दाखवण्यात येणार आहे. हि निवडणुक प्रकिया जगाला सांगण्यासाठी संपुर्ण भारतातुन दोन जिल्हाधिकार्यांची निवड झाली आहे. त्यात सोलापुर जिल्ह्याच्या कन्या तथा सेलमच्या (तामिळनाडू) जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांचा समावेश असल्याने सबंध सोलापूरवासीयासांठी गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे.

निवडणुका म्हटल्या की, जनसामान्यांमध्ये मोठमोठ्या नेतेमंडळीची चर्चा होताना दिसते. परंतु निवडणुक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जे अधिकारी परिश्रम घेतात. त्यांची मात्र कुठेच चर्चा होत नाही. तसेच भारताची निवडणुक प्रकीया कशी पार पडते हे जगाला माहित व्हावे. यासाठी आता नॅशनल जिओग्राफी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने पुढाकार घेतला असुन, संपुर्ण जगातील वेगवेगळ्या घडामोडीवर चित्रीकरण करून नेमके सत्य घटना अथवा त्यामागील तथ्य जगासमोर प्रदर्शित करणाऱ्या या वृत्तवाहिनीवर ता. १५ ऑगस्ट रोजी भारतातील निवडणुक प्रकीया नेमकी कशी पार पडते यावर माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे. हा माहितपट सांगण्यासाठी संपुर्ण भारतात दोन जिल्हाधिकार्यांची निवड झालेली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणासीचे जिल्हाधिकारी व दुसऱ्या सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांचा समावेश आहे. सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी व त्यांनी तेथील केलेल्या कामांची दखल घेऊनच त्यांची यासाठी निवड झालेली आहे.

भारतातील लोकशाही प्रकीया नेमकी कशी पार पडते हे जगाला अद्याप माहित नाही. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी व असंख्य अधिकारी कशा प्रकारे निवडणुक काळात सर्व कामकाज पार पाडतात. भारतातील निवडणुका किती चांगल्याप्रकारे होतात. यासाठी परिश्रम, कष्ट घेणारे खरे नायक कोण. हे या माहितीपटातुन संपुर्ण जगाला पाच विवीध भाषातुन दाखविण्यात येणार आहे. भारताच्या निवडणुकीविषयी प्रथमच अशा प्रकारे माहितीपट दाखविण्यात  येत असल्याने व ती सांगण्याची संधी सोलापुर जिल्ह्याच्या कन्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतक होत आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या निवडणुक प्रकीयामध्ये सेलम जिल्ह्याची पहिली महिला निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला अभिमान वाटतो. जगासमोर वृत्तवाहिन्याच्या माध्यामातुन देशातील निवडणुक प्रकीया सांगण्याची संधी म्हणजे सेलममधिल कामाची पोचपोवती आहे. 
- रोहिणी भाजीभाकरे-बिदरी, जिल्हाधिकरी सेलम (तामिळनाडू)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohini Bhajibhakre explain Indian election process to world