केंद्रात उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी मराठमोळया रोहिणी भाजीभाकरे

अक्षय गुंड
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शैक्षणिक क्षेत्राविषयी आवड असुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती आपल्या देशात कशाप्रकारे राबवता येतील यासाठी प्रयत्न करणार.
- रोहिणी भाजीभाकरे-बिदरी उपसचिव उच्च शिक्षण विभाग नवी दिल्ली

उपळाई बुद्रूक (माढा जि. सोलापुर) : तमिळनाडू राज्यातील सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणुन कर्तव्य बजावलेल्या सोलापूरच्या कन्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या २००८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ११८ व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती तामिळनाडू केडरमध्ये करण्यात आली. भाजीभाकरे यांनी मदुराई जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेलीच्या उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरचा 'भाजीभाकरे' पॅटर्न तामिळनाडू राज्यात प्रसिध्द झाला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत तामिळनाडू राज्यात मदुराई येथे कार्यरत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते मनरेगा' या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच द बेटर इंडिया या वेबसाईटने जाहिर केलेल्या सर्वात्कृष्ट दहा  जिल्हाधिकार्यांमध्ये देखील त्यांची निवड झाली होती. त्यांची प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने त्यांना सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. नुकतीच त्यांची भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात. आयआयटी, आयआयएम, एम्स, एनसीईआरटि, सीबीएसई, आयसीएसई, युजीसी व इतर प्रमुख प्रमुख संस्था या खात्याअंतर्गत येतात.

शैक्षणिक क्षेत्राविषयी आवड असुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती आपल्या देशात कशाप्रकारे राबवता येतील यासाठी प्रयत्न करणार.
- रोहिणी भाजीभाकरे-बिदरी उपसचिव उच्च शिक्षण विभाग नवी दिल्ली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohini Bhajibhakre selected as a deputy secretary in higher education department at New Delhi