कऱ्हाडला झोपडपट्टीमुक्त "स्मार्ट सिटी' बनवू - रोहिणी शिंदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मागेल त्याला घर' देणार असल्याचे जाहीर करून झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या सहकार्याने येत्या पाच वर्षांत कऱ्हाड शहर झोपडपट्टीमुक्त बनवण्याकडे अधिक कल राहील. कऱ्हाडला "स्मार्ट सिटी' बनवण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी येथील "सकाळ' विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उमेश शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शहराच्या वाटचालीसंदर्भात केलेली बातचित...

यशात अनेकांचा वाटा
थेट नगराध्यक्ष निवडताना शहरातील मतदारांनी माझी निवड केली आहे, त्यामुळे ज्या नेत्यांनी मला या पदासाठी पात्र ठरवून उमेदवारी दिली व ज्या जनतेने माझ्यावर मताद्वारे विश्‍वास टाकला, त्यास तडा जावू देणार नाही. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या सहकार्याने मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अनेकांचा या यशात तितकाच वाटा आहे.

प्रत्येकाने स्वत: उमेदवार असल्याचे समजून निवडणुकीत काम केले. त्यामुळेच हे यश मिळाले.

सुविधा देण्याचा प्रयत्न
शहरात अद्याप मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यादृष्टीने स्वच्छता, आरोग्याचे काम अधिक प्रभावीपणे करावे लागेल. शहरातील बाराडबरी परिसर व शिवाजी स्टेडियम मागील झोपडपट्टीला नुकतीच भेट दिली. त्यावेळी तेथील गंभीर अवस्था पाहता फार काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे दिसून येते. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांची अद्याप वानवा आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधा मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहील.

योजनांना निधी आणणार
शहरातील रेंगाळलेल्या योजना मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहील. त्यासाठी पालिकेत रखडलेल्या योजना, विकासकामांबाबत माहिती देण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रखडलेली कामे गतीने सुरू करण्याबरोबरच संरक्षक भिंत, गांडूळ खत प्रकल्प मार्गी लावले जातील. श्री. चरेगावकर, श्री. भोसले व श्री. पावसकर यांच्या सहकार्याने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून शहराच्या प्रलंबित, निधीअभावी रखडलेल्या योजनांसह नवीन विकासकामांसंदर्भात चर्चा केली जाईल. जास्तीत जास्त निधी आणला जाईल. विकासासाठी पक्षपात केला जाणार नाही. शहराला विकासाकडे नेणाऱ्या प्रकल्पाला प्राधान्य राहील.

सुविधांयुक्त शहर बनवू
सर्व सोयींनियुक्त समृद्ध असे कऱ्हाड शहर असावे, अशी माझी इच्छा आहे. शहरात मूलभूत सुविधाच नाहीत, त्यापासूनच सुरवात करावी लागेल. विकासाच्या दृष्टीने पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे देण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. त्यामुळे चांगली कामे होतील, असा विश्‍वास वाटतो. पालिकेचे कामकाज माझ्यासाठी नवीन असले तरी ते अभ्यासू सहकारी नगसेवकांच्या मदतीने ते शिकेन.

कऱ्हाड शहराचा विकास हाच एकमेव उद्देश असल्याने भाजपचे बहुमत जरी नसले तरी विकासासाठी पुढे येणाऱ्या सर्वांना बरोबर घेवून काम करू. त्यामुळे कामकाज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड

Web Title: rohini shinde interview