इंदापूरच्या रोहित चव्हाणला दक्षिण कोरियामधील भालाफेकमध्ये सुवर्णपदक

इंदापूरच्या रोहित चव्हाणला दक्षिण कोरियामधील भालाफेकमध्ये सुवर्णपदक

वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण या युवकाने दक्षिण कोरिया येथे सुरु असलेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले असुन, भारताचे नाव जगामध्येचमकावले. 

दक्षिण कोरिया येथे १३ वी जागतिक फायर फायटर्स स्पर्धा सुरु आहेत. कळंबच्या रोहित चव्हाण ने भालाफेक स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व केले. भालाफेक स्पर्धेमध्ये देशातील एकमेव खेळाडू होता. ६३ देशातील खेळाडूंशी सामना करत त्याने  ६८ मीटर लांब भाला फेकुन प्रथम क्रमांक पटाकवून सुवर्णपदक मिळविले.    

रोहित चव्हाणचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केवळ जिद्दीच्या जोरावर यशाच्या मिळविले आहे. गेल्या चार वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीला यश आले असून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना, रोहितने सातासमुद्रापार जावून भालाफेक स्पर्धेमध्ये गगन भरारी घेतली आहे. तो सध्या मुंबईमध्ये अग्निशामक दलात नोकरी मध्ये कार्यरत आहे. सुरवातीपासुन रोहित याने खेळातील प्राविण्य दाखवल्याने अग्निशामक दलाने त्यास प्रोत्साहन दिले. अग्निशामक दलाच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकावले होते. व यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे दक्षिण कोरिया सुरु असलेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेकरिता त्याला पाठवण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने ६८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक मिळवले आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी रोहितचे अभिनंदन केले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार सुळे, आमदार भरणे, माजी सहकारमंत्री पाटील व सभापती माने यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com