esakal | राष्ट्रवादीच ठरलं; 2024 साठी पहिली उमेदवारी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच ठरलं; 2024 साठी पहिली उमेदवारी जाहीर

सांगली - दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सावली भासणारा त्यांचा चिरंजीव रोहित हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेचा उमेदवार असेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी तासगाव येथे झाले. त्यावेळी रोहितच्या भाषणाने खुद्द शरद पवार यांनाही भारावून सोडले. 

राष्ट्रवादीच ठरलं; 2024 साठी पहिली उमेदवारी जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सावली भासणारा त्यांचा चिरंजीव रोहित हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेचा उमेदवार असेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी तासगाव येथे झाले. त्यावेळी रोहितच्या भाषणाने खुद्द शरद पवार यांनाही भारावून सोडले. 

आबांच्या आकस्मित निधनानंतर 2014 च्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती सुमन पाटील आमदार झाल्या. आता आगामी विधानसभेलाही या मतदार संघातून त्याच उमेदवार असतील. यावेळी लढत काट्याची असणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आबांच्या पुतळा अनावरणाचे निमित्त साधून आबा गट मजबूत असल्याचे प्रदर्शन राष्ट्रवादीने घडवले. अत्यंत भावूक असा हा क्षण होता. त्यात शरद पवार आबांच्या आठवणीने हळहळले. रोहित पाटील यांच्या भाषणाने मात्र ते सुखावले. भविष्यातील आर. आर. मला तुझ्यात दिसतोय, अशा शब्दांत त्यांनी रोहितचे कौतुकही केले. 

या घडामोडींत जयंत पाटील यांनी पुढचे पाऊल टाकत या मतदार संघाची भविष्याची दिशा स्पष्ट केली. पुढील विधानसभा निवडणुकीला म्हणजे 2024 ला रोहित पाटील विधानसभा लढतील, असे त्यांनी जाहीर केले. रोहित यांचे वय अजून लहान आहे, ते विधानसभा लढवण्यास सध्या पात्र नाहीत. त्यांना 2024 पर्यंत वाट पहावी लागेल. तोवर सुमनताईंच्या पाठीशी ताकद कायम ठेवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. 

loading image
go to top