रोहित पवार यांचे करमाळ्याच्या "या' प्रश्‍नावर राहणार लक्ष 

Rohit Pawar focuses on the problem in Karmala
Rohit Pawar focuses on the problem in Karmala

करमाळा (सोलापूर) : कुकडीचे पाणी करमाळा तालुक्‍यात 25 तारखेच्या दरम्यान सोडणार आहेत. याबरोबर करमाळ्यातील प्रश्‍नांसंबधी लक्ष घालणार आहे, असे आश्‍वासन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. 
करमाळा तालुक्‍यातील मांगी तलाव, कोळगाव धरण व अन्य छोट्या-मोठ्या प्रकल्पात कुकडीचे पाणी सोडण्याची विनंती आमदार पवार यांच्याकडे करमाळा राष्ट्रवादीने केली आहे. याबाबत त्यांना निवेदन दिल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोशल मीडियाचे नितीन झिंजाडे यांनी दिली.

हेही वाचा : विश्‍वास ठेवा! संस्था नोंदणी होते फक्त 53 रुपयांतच

सीना नदीतल्या पाण्याने कोळगाव धरण भरल्यास

निवेदनात नमूद की, कुकडी प्रकल्पातील पाणी करमाळा तालुक्‍यातील मांगी, कोळगाव, वीट, राजुरीसह अन्य तलावांत सोडणे गरजेचे आहे. यावर्षी तालुक्‍यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. यामुळे फळबागा, जनावरे व माणसांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‌भवणार आहे. मांगी तलाव व सीना नदीतल्या पाण्याने कोळगाव धरण भरल्यास निम्म्या तालुक्‍यातील पाण्याची समस्या संपणार आहे. 

25 तारखेला करमाळ्यासाठी पाणी सोडणार

25 तारखेला करमाळ्यासाठी पाणी सोडणार असून करमाळ्यातील प्रश्‍नांसंबंधी लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन आमदार पवार यांनी दिले असल्याचे झिंजाडे यांनी सांगितले. यावेळी धनंजय ढेरे, सचिन नलावडे, चंद्रकांत जगदाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com