जेव्हा रोहित पवार साध्या सलूनमध्ये दाढी करतात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार यांचा सध्या या मतदारसंघातील वावर वाढला आहे.

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार यांचा सध्या या मतदारसंघातील वावर वाढला आहे.

रोहित पवार आज जामखेडमध्ये होते. यावेळी त्यांनी जामखेडच्या एका छोट्या सलून दुकानात जाऊन दाढी करुन घेतली. जामखेड दौऱ्यावर असताना अचानक सलून दुकानात जाऊन कटिंग केली.

थेट रोहित पवार आपल्या दुकानात आल्याचे पाहून सलूनचालक संदीप राऊतची चांगली धावपळ उडाली. कंगवा कात्री चालवताना संदीप थोडं अडखळला, मात्र अखेर हात बसल्यावर संदीपनेही मग कमाल दाखवली.

विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार नशीब अजमावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अनेक बैठका सध्या या मतदारसंघात सुरु आहेत. पक्षाकडेही त्यांनी उमेदवारी मागितली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit pawar shaving at karjat jamkheds saloon