#WorldDrugDay : व्यसनेच्या आहारी गेलेला रोहीत निघाला बाहेर! 

drugs
drugs

सोलापूर : प्रेम भंग झाल्यानंतर रोहीतने दारुला जवळ केले. ऐन तारुण्यात तो व्यसनेच्या आहारी गेला होता. त्याची अवस्था पाहून आई-वडीलही अस्वस्थ झाले होते. अनेक प्रयत्नानंतर शेवटी तज्ञांनी रोहीतचे समुपदेशन केले. आयुष्याचा नेमका आनंद कशात आहे हे तज्ञांनी त्याला पटवून दिले. आता त्याने दारू पूर्णपणे सोडलीय, प्रेयसीला विसरून त्याने नवीन आयुष्याची सुरवात केली आहे. 

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने सोलापूरच्या गावठाण भागात राहणाऱ्या रोहीतच्या पालकांशी "सकाळ'ने संवाद साधला. ते म्हणाले, "आमचा रोहीत अभियांत्रिकीची विद्यार्थी होता. डिप्लोमाला शिकत असताना एका मुलीच्या प्रेमात पडला होता. बरेच दिवस दोघांचे प्रेमप्रकरण चालू होते. आम्हाला त्याच्या प्रेमप्रकरणाची कुजबूज लागली होती. सारं काही आनंदात चालू असताना अचानक एकेदिवशी त्याच्या मैत्रिणीने त्याला दगा दिला. रोहीतची साथ सोडून तिने दूसऱ्याच तरुणाशी मैत्री केली होती. त्यानंतर रोहीतला धक्का बसला. दुख: विसण्यासाठी त्याने दारूला जवळ केले. आमच्या नकळत तो व्यसन करायचा. घरातून कॉलेजला म्हणून जायचा पण बाहेर तो दारू पिण्यासाठी फिरायचा. त्याला दारूच्या व्यसनापासून दूर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. दारुमुळे आयुष्याचे कसे नुकसान होत आहे हे समुपदेशकाने सांगितले. दारू बंद केल्यामुळे तो अगदी वेड्यासारखा करत होता. दोन-तीन महिन्याच्या उपचारानंतर त्याच्यात सकारात्मक बदल दिसून आले. त्याने नियमीतपणे कॉलेजला जाणे चालू केले.' 

आता रोहीतने पून्हा नव्याने आयुष्य जगायला सुरवात केली आहे. आम्ही त्याची अवस्था समजून घेवून वेळीच मानसोपचार तज्ञांकडे नेले. ऐन तरुण वयात आमचा मुलगा हातून जातोय का अशी भीती निर्माण झाली होती, पण उपचार आणि सुंसवादाने आम्ही त्याला व्यसनातून बाहेर काढू शकलो, असे त्याच्या पालकांनी सांगितले. 

मित्रांच्या संगतीमधून किंवा प्रेमप्रकरणात अपयश आल्यानंतर तरुणांमध्ये दारू किंवा इतर व्यसन लागतात. कुटूंबीयांनी, मित्रांनी त्याची अवस्था समजून घेणे आवश्‍यक आहे. समुपदेशन आणि आवश्‍यक उपचारानंतर त्या व्यक्तीला अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर करता येते. 
- डॉ. नितीन भोगे, मानसोपचारतज्ञ 

दरवर्षी 26 जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरुपात साजरा केला जातो. युनोने 1988 साली याची घोषणा केली. 26 जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (1987) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com