ही वाट यमसदनी जाते... 

मार्तंड बुचुडे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील अनेक ठिकाणे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तालुक्‍याच्या हद्दीत केवळ 25 किलोमीटरचा महामार्ग असला, तरी तो अनेकांच्या जिवावर उठला आहे. त्याने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. महिन्याला एक-दोन अपघात ठरलेले आहेत. वाहनांच्या नुकसानीची तर मोजदादच नाही. महामार्गावरील "टोल'वसुली मात्र मोठ्या जोमात सुरू आहे. 

पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील अनेक ठिकाणे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तालुक्‍याच्या हद्दीत केवळ 25 किलोमीटरचा महामार्ग असला, तरी तो अनेकांच्या जिवावर उठला आहे. त्याने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. महिन्याला एक-दोन अपघात ठरलेले आहेत. वाहनांच्या नुकसानीची तर मोजदादच नाही. महामार्गावरील "टोल'वसुली मात्र मोठ्या जोमात सुरू आहे. 

गेली 20 वर्षे "टोल'वसुली जोमात सुरू आहे. रस्तादुरुस्ती होत नाही. रस्त्याच्या साइडपट्ट्या तर कधी भरल्याच जात नाहीत. तेही अपघातास निमंत्रण ठरत आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली वळणेही याला कारणीभूत आहेत. अनेक ठिकाणी हॉटेलचालकांनी मर्जीप्रमाणे रस्त्याचे दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे ठेकेदार, तसेच अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. 

सुपे व नारायणगव्हाण येथे अद्यापि एकेरीच वाहतूक सुरू आहे. जागाअधिग्रहणाच्या नावाखाली तेथील प्रश्‍न लोंबकळत पडला आहे. सर्वाधिक अपघात तेथेच झाले आहेत. नुकताच सुपे चौकात एकास जीव गमवावा लागला, तर दुसऱ्यास अपंगत्व आले. 

बाह्यवळण रस्त्याची गरज 
सुपे येथे महामार्गास पारनेर व वाळवणे हे रस्ते येऊन मिळतात. वाळवणे रस्त्याने रांजणगाव मशीद, अस्तगाव, अपधूप व पिंप्री गवळी आदी गावांची वाहतूक असते. त्यामुळे सतत वर्दळ असते. तसेच, शालेय मुलांचीही सकाळ- संध्याकाळी मोठी गर्दी असते. त्यासाठी येथे भुयारी मार्ग किंवा या गावासाठी बाह्यवळण रस्त्याची मोठी गरज आहे. 

कायमच वर्दळ 

सुपे बसस्थानक चौकात, तसेच विश्रामगृहापर्यंत अनेकदा रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होते. या परिसरातील हॉटेले, चहा स्टॉल, बेकरी व पुण्याहून नगरकडे जाणारी व नगरहून पुण्याकडे जाणारी वाहने हार घेण्यासाठी हमखास थांबतात. त्या प्रवाशांच्या वाहनांमुळेही कोंडी होते. दोन वर्षांपूर्वी 

अतिक्रमणे जैसे थे 

सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटविली होती; मात्र, नंतर पुन्हा "जैसे थे' स्थिती राहिली. 

लूटमार जीवावर बेतते 

नगर-सुपे दरम्यान अपघात होत आहे. या अपघातांबरोबरच या रस्त्यावर वाहनचालकांच्या लुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनधारक जीवमुठीत धरूनच प्रवास करीत आहेत. या रस्त्यावर लुटमारीच्या घटना मोठया प्रमाणात घडलेल्या आहेत. 

लुटींचे केंद्र 

जातेगाव व चास शिवार लुटीचे केंद्र बनलेले आहे. या ठिकाणी शस्त्राचा धाक दाखवून अनेक लुटीच्या घटना घडलेल्या असून त्यांचा तपास सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This route goes to Yamsdani ...