उपद्रवी माकडाला केले जेरबंद; वन विभाग, प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांची कामगिरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

डॉट गनचा वापर करून त्यास अचूक नेम लावून माकडाला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून पिंजऱ्यात कैद केले आहे.

सोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले. 

कोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते. आक्रमक स्वभावामुळे त्या माकडाने दहा पेक्षा जास्त नागरिकांवर हल्ला केला आहे. जखमींमध्ये वयोवृद्धांसह लहान मुलांचाही समावेश आहे. परिसरातील नागरिकांनी या संदर्भातील तक्रार वन विभागाकडे केली. वन विभागने महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांच्याशी संपर्क केला. रविवारी सकाळपासून त्या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. डॉट गनचा वापर करून त्यास अचूक नेम लावून माकडाला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून पिंजऱ्यात कैद केले आहे. लवकरच त्या माकडास जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

solapur

ही कामगिरी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The rowdy monkey has caught in solapur