उद्यापासून सुरू होणार आरटीओच्या नव्या रॅम्पचे काम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

सोलापूर - वाहनांची अचूक तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या रॅम्पची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाची सुरवात सोमवार (ता. ६) पासून होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी आज ‘सकाळ’ला दिली.

सोलापूर - वाहनांची अचूक तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या रॅम्पची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाची सुरवात सोमवार (ता. ६) पासून होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी आज ‘सकाळ’ला दिली.

यापूर्वीचा हा ट्रॅक १५० मीटरचा होता, यात सुधारणा करून २५० मीटरचा ट्रॅक उभा करण्यात येणार आहे. वाहनांची ब्रेकिंग एफीसिएन्सीची यात तपासणी करण्यात येणार आहे. गाडी कोणत्या वेगामध्ये ब्रेक दाबल्यानंतर कुठे थांबते याचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. गाडीची तपासणी करताना याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून होणार आहे. ट्रॅकच्या सुरवातीला व शेवटी असे दोन कॅमेरे लावण्यात येणार आहेत. 

वाहनाचे इंजिन, हेडलाइट, टायर आदींच्या तपासणीवरून त्यात काही दोष आहेत का हे तपासण्यात येणार आहेत. यात दोष आढळल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी सांगण्यात येणार आहे.
 

आरटीओच्या सर्व सेवा होणार ऑनलाइन
प्रायोगिक तत्त्वावर सध्या लर्निंग लायसन्सची सुविधा ऑनलाइन देण्यात आली आहे. याच पद्धतीने आरटीओच्या सर्व सेवा ऑनलाइन देण्यावर भर असणार आहे. परमनंट लायसन, लायसनचे नूतनीकरण, ना हरकत प्रमाणपत्र आदी सुविधा ऑनलाइन मिळतील. यासंबंधीचे पैसेही ऑनलाइन भरता येणार आहेत. वाहनधारकांना फक्त चाचणी देण्यासाठी कार्यालयात यावे लागणार आहे. नवीन वाहन खरेदी करताना वाहनांची तपासणी बंधनकारक असते. वाहनाच्या डीलरकडून वाहनांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच वाहनांची कागदपत्रेही घरपोच देण्यात येणार आहेत.

Web Title: rto new ramp work start tomorrow