आरटीओ कार्यालय स्वीकारणार पाचशे, हजारच्या नोटा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - वाहनांचे थकीत कर, शुल्क आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांना 24 नोव्हेंबरपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी केले. नोटांचा तुटवडा आणि ग्राहकांची गैरसोय विचारात घेता केंद्रीय परिवहन आयुक्त कार्यालयाकडून काल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांचे कर व शुल्क भरायला येणाऱ्या नागरिकांकडून पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारा, असे पत्र मिळाले आहे. त्यानुसार उद्या (ता.

कोल्हापूर - वाहनांचे थकीत कर, शुल्क आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांना 24 नोव्हेंबरपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी केले. नोटांचा तुटवडा आणि ग्राहकांची गैरसोय विचारात घेता केंद्रीय परिवहन आयुक्त कार्यालयाकडून काल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांचे कर व शुल्क भरायला येणाऱ्या नागरिकांकडून पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारा, असे पत्र मिळाले आहे. त्यानुसार उद्या (ता. 19) पासून वाहनांचे व्यवसाय कर, परमीट, नोंदणी, पर्यावरण शुल्क आदींची रक्कम भरायला येणाऱ्यांकडून पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. 

Web Title: RTO Office accept five hundred, a thousand notes