आरटीओच्या सर्व्हर डाउनने उमेदवारांना दणका..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

कोल्हापूर - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सर्व्हरची अवस्था कधी बंद तर कधी सुरू अशी आहे. याचा दणका प्रशिक्षणार्थी वाहन परवाना काढण्यासाठी आलेल्या उमेदवारांना बसला आहे. ऑनलाइन पैसे भरूनही त्याची पावतीच येत नाही, सर्व्हर डाउनमुळे परीक्षेसाठी तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. समस्या तीच मात्र उपाय शून्य अशा कार्यालयाच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

आरटीओ कार्यालयात रोज सव्वाशे ते दीडशे उमेदवार वाहने परवाना काढण्यासाठी येतात. काही दिवसापासून शहर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या शहरात ‘ट्रॅफिक ड्राइव्ह’ घेतला जात आहे. कारवाईपासून बचाव करण्यासाठी वाहन परवाना काढण्यास तरुण पसंती देत आहेत. त्यामुळे परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत अधिक भर पडू लागली आहे, मात्र आरटीओ कार्यालयातील सर्व्हर दोन दिवस वारंवार बंद पडू लागला आहे. काल (ता. ३) उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म व पैसे भरले होते. त्यापैकी अनेक उमेदवारांच्या पैसे भरलेल्या पावत्याच मिळू शकलेल्या नाहीत. त्यातील अनेकांनी पुन्हा पैसे भरले. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व्हर सुरू नसल्याने उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी ताटकळत बसावे लागले. सर्व्हरचे दुखणे रोजचे झाले आहे. यावर एकदा कायमचा उपाय करा आणि आमचे हाल वाचवा अशा प्रतिक्रिया आज उमेदवारांतून ऐकावयास मिळत होत्या.

Web Title: RTO server down