आरटीओंनी दाखवला कायदा आणि माणुसकीही... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सांगली ः ट्रकमधून झारखंडला घेऊन जाणाऱ्या ट्रकला मोटर वाहन निरिक्षकांनी शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे रोखले. अधिकाऱ्यांनी त्यांना कायदा दाखवला मात्र माणुसकी दाखवत त्यांची सर्व काही सोय करून बसने गावी जायची व्यवस्था केली. कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे खाणकामासाठी आलेले 96 मजुर टाळेबंदीत साठ दिवस अडकले होते. गावी जाण्यासाठी व्याकूळ झालेल्या या मजुरांनी ट्रक प्रवासाचा अवैध मार्ग निवडला मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना वैध मार्गाने गावी पाठवले. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम जिल्ह्यात पोलिसांच्या बरोबरीने नाका तपासणी मोहिमेत सहभागी झाली आहे. मोटार वाहन निरीक्षक अमर भंडारे, सागर विश्‍वासराव, सागर चौगुले, सहायक निरीक्षक तेजस बोऱ्हाडे, प्रशांत गावडे, समाधान महानवर, किरण चौधरी यांच्या पथकाने शेळकेवाडीजवळ हा ट्रक पकडल्यानंतर आता पुढे काय विवंचनेत सारे मजूर होते. मात्र अधिकाऱ्यांच्या माणुसकीच्या वागणुकीचा सुखद धक्का त्यांना बसला.

तहसिलदार बी. जे. गोरे व कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी चौकशी केली. त्यांच्यावर प्रवासासाठी कोणतीही परवानगी नव्हती. त्यानंतर त्यांना कवठेमहांकाळच्या एसटी आगारात नेण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांची सर्व भोजनाची व्यवस्थाही केली. आगार व्यवस्थापक स्वप्नील पाटील यांनी तातडीने पाच बसेसच्या माध्यमातून त्यांना गोंदिया जिल्ह्यांपर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था केली. सर्वच कर्मचाऱ्यांना मोफत निवांतपणे सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्या गावाच्या दिशेने जाता आले याचा मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

"" सध्याच्या महामारीतील शासन नियम तसेच अवैध प्रवासी वाहतुक असे गुन्हे असले तरी मजुरांची होणारी होरपळ जाणून घेऊन सर्वच वरीष्ठांनी कार्यवाहीचे आदेश दिले. सर्व 96 मजुरांसाठी एसटीची सोय होईपर्यंत भोजनाची सोय करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून त्यांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले.'' 
अमर भंडारे 
मोटार वाहन निरीक्षक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO showed law and humanity too ...