प्रतिकूल परिस्थितीत पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या रुक्मिणी मानेंचा सत्कार

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 6 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) : आतिशय प्रतिकुल परिस्थितीतून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या पेनूरची रुक्मिणी माने यांचा सत्कार मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला.

यावेळी बोलताना अंजिक्यराणा पाटील म्हणाले पेनुर सारख्या ग्रामीण भागातुन अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत रुक्मिणी माने या भगिनीने जे यश प्राप्त केले  आहे, ते निश्चीतच कौतुकास्पद असुन कोणत्याही परिक्षेत प्रामाणिक व ध्येय समोर ठेऊन प्रयत्न केले तर यश नक्कीच प्राप्त होते. त्यासाठी विद्यार्थ्यानी  स्वताच्या मनातील न्युनगंड मनातुन काढुन टाकला पाहिजे.                  

याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, सभापती नागेश साठे, युवक अध्यक्ष एजाज तलफदार,विद्यार्थी अध्यक्ष सुदर्शन कादे, महिला अध्यक्ष सिंधूताई वाघमारे, रत्नमाला पोतदार, हणुमंत पोटरे, जग्गनाथ कोल्हाळ, माऊली चव्हाण, रामराजे कदम, शशिकांत पाटील, सचिव सचिन पाटील,माजी  सभापती भारत गायकवाड, भारत सुतकर, प्रदीप साठे, ब्रम्हदेव चव्हाण, धनाजी गोडसे, मोहन चव्हाण, अशोक क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, विजय पोतदार व आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: rukmini mane felicitate for appointed as psi