काळ्या पैशातील रुपयाही नष्ट झाला नाही - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

विंग - मोदी सरकारचे नोटाबंदी हे ब्रह्मास्त्र आहे. यातून काळ्या पैशातील एक रुपयाही नष्ट झालेला नाही. मग सरकारचा हा उपद्‌व्याप कशासाठी? पैसा नष्ट होण्याऐवजी पांढरा होऊन तो बॅंकेत पुन्हा जमा झाला आहे.

विंग - मोदी सरकारचे नोटाबंदी हे ब्रह्मास्त्र आहे. यातून काळ्या पैशातील एक रुपयाही नष्ट झालेला नाही. मग सरकारचा हा उपद्‌व्याप कशासाठी? पैसा नष्ट होण्याऐवजी पांढरा होऊन तो बॅंकेत पुन्हा जमा झाला आहे.

पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र व गुजरातची विकासाची तुलना करण्यासाठी एका व्यासपीठावर या, असे आव्हान मी केले होते. आता मोदींनी निवडणुकीआधी दाखवलेले एक तरी स्वप्न यशस्वी झाले आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
विंग (ता. कऱ्हाड) येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन व मंजूर कामांचे भूमिपूजन काल झाले. त्या वेळी ते बोलत होते. मदनराव मोहिते अध्यक्षस्थानी होते. आमदार आनंदराव पाटील, अजितराव पाटील- चिखलीकर, सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, राजेंद्र चव्हाण, दुर्गेश मोहिते, लक्ष्मण देसाई, सुभाषराव पाटील, सयाजीराव यादव, निवासराव शिंदे, उत्तमराव पाटील, डॉ. सचिन कोळेकर, शंकरराव खबाले, अलका पवार, बबनराव शिंदे, सचिन पाचुपते, शिवाजी पाटील, प्रल्हाद कणसे, दादासाहेब होगले, ॲड. राम होगले, चंदा काळे, मंगल पाटील, मालन होगले, हर्षल राऊत, धनाजी पाटील, आबासाहेब खबाले, आनंदराव शिंदे, बाळासाहेब पाच्छापुरे यांची उपस्थिती होती. 

चव्हाण म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या कष्टामुळे पश्‍चिम महाराष्ट्राची प्रगती झालेली दिसते. लोकांच्या कष्टावर देश पुढे चालला आहे; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आकसाने पश्‍चिम महाराष्ट्राकडे पाहात आहेत. केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येक निर्णय भूलथापा ठरले आहेत. हे अपयश लपवण्यासाठी लोकांचे लक्ष जाहिरातबाजीकडे वेधत जात आहेत. मला मुख्यमंत्रिपदाची संधी न मागता मिळाली. दिल्लीतील कामाच्या अनुभवामुळे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याबाबत आत्मविश्वास होता. आघाडी सरकारने अनेक कामे उभी केली; परंतु याची जाहिरातबाजी करू शकलो नाही. सध्याचे सरकार काही न करता केवळ जाहिरातबाजी करत आहे.

आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, सचिन पाचुपते, अजितराव पाटील-चिखलीकर, बबनराव शिंदे, शंकरराव खबाले यांची भाषणे झाली. या वेळी नवनिर्वाचित पोलिस पाटील रमेश खबाले व ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब होगले यांचा सत्कार केला. शंकरराव खबाले, अलका पवार, निळकंठ गरुड, दिगंबर कुलकर्णी, शिवाजी पाटील, प्रल्हाद कणसे यांनी स्वागत केले. प्रल्हाद कणसे यांनी आभार मानले.

Web Title: Rupee seen the black money was not destroyed