अक्कलकोटच्या रुपेशकुमारचे 'लँड 1857' द्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

राजशेखर चौधरी
मंगळवार, 5 जून 2018

अक्कलकोटला : अक्कलकोटचा कन्नड माध्यमात शिक्षण घेतलेला सुपूत्र रुपेशकुमार तिम्माजी हा निरंतर कष्ट आणि उपजत कलेद्वारे  'लँड १८५७' या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. हा चित्रपत येत्या शुक्रवारी ८ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील या युवकाची भरारी कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी आहे. रूपेश कुमार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशालेत झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकल इंजिनिअर मध्ये डिप्लोमा केला पण अभिनयाची आवड जपलेल्या रुपेशकुमार यात रमलाच नाही.

अक्कलकोटला : अक्कलकोटचा कन्नड माध्यमात शिक्षण घेतलेला सुपूत्र रुपेशकुमार तिम्माजी हा निरंतर कष्ट आणि उपजत कलेद्वारे  'लँड १८५७' या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. हा चित्रपत येत्या शुक्रवारी ८ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील या युवकाची भरारी कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी आहे. रूपेश कुमार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशालेत झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकल इंजिनिअर मध्ये डिप्लोमा केला पण अभिनयाची आवड जपलेल्या रुपेशकुमार यात रमलाच नाही. चित्रपटसृष्टीत काम करायचे लहानपणीच ठरविल्यामुळे त्याने रामानंद सागर यांच्या अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे पूर्ण केले.

अक्कलकोटचे सुपूञ सिने कलावंत अनेक कन्नड चित्रपट व मालिकेतून विविध भूमिका करणारे अभिनेते रुपेशकुमार आता मराठी चित्रपटात भूमिका करत असून ' लँड १८५७ ' नावाचा मराठी चित्रपटात अजय देवगण सारखी भूमिका साकारत आहेत. लहानपणापासून वडील लक्ष्मीकांत तिमाजी यांच्यापासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या आणि आवड जपलेल्या रुपेशकुमार यांनी अनेक कन्नड चित्रपट आणि मालिकांमध्ये धडाकेबाज भूमिका केल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे.

विजयालक्ष्मी भोसले निर्मित
' लँड १८५७ '  हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 8 जूनला येणार आहे. 
रुपेशकुमार याने कन्नड टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची सुरूवात केली आहे. त्यात त्याने चांगले यश मिळवले. सर्वप्रथम रंगोली या मालिकेपासून त्याची सुरुवात झाली. पुढे ऑखे, साईबाबा, जय गंगा मैया यासारख्या मालिकेत त्याची भूमिका बहरत गेली. 

स्वातंत्र्यपुर्व काळात अस्मानी संकटामुळे खेडी ओस पडत चालली होती तेव्हा महात्मा गांधीजीनी "खेड्याकडे चला" हा नारा देऊन शेती समृध्द करण्यावर भर देऊन शहरात येण्याऐवजी खेड्यातच राहुन शेती व व्यवसाय करा असा संदेश दिला. पण आज खेडीसुध्दा खेडेपणाची कात टाकुन जागतीकीकरणामुळे सुधारत असल्याचे दिसते. याला सामाजिक व राजकिय स्थित्यांतरे कारणीभुत असली तरी खेड्याजवळुन जात असलेल्या महामार्गामुळे जमीनीली भाव आले. जमिनीचा मिळणारा लाखो रुपये मोबदला माणुस व त्यांचे स्वभाव बदलायला भाग पाडतो. जी गावकीची नाती वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने टिकुन होती. ती अचानक नकोशी वाटायला लागली जागतिकीकरणाच्या चक्रात अडकुन ग्रामीण संस्कृतीच्या पाऊलखुणा कशा नष्ट होत गेल्या यावर सुंदरपणे भाष्य करणारा "लँड १८५७ " हा चित्रपट येत्या ८ जुनला रुपेशकुमार यांच्या अभिनयातून प्रदर्शित होत आहे.

Web Title: Rupesh kumar entry in marahti cinema