हॉटेल्स, रेस्टॉरंटसह खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खवय्यांची गर्दी 

हॉटेल्स, रेस्टॉरंटसह खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खवय्यांची गर्दी 

सोलापूर :  गर्दी, गोंधळ नाही.. शांत आणि स्वच्छ परिसर.. वाहन पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा आणि महत्त्वाचे म्हणजे खाण्यास सर्वकाही उपलब्ध असल्याने जुळे सोलापूरचा परिसर आता खाऊगल्ली म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सायंकाळनंतर जुळे सोलापुरातील सर्वच हॉटेल्स, रेस्टारंट आणि हातगाड्या खव्वयांच्या गर्दीने फुलून जात आहेत.

खास जेवणासाठी, नाश्‍तासाठी जुळे सोलापुरात फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चटकदार खाण्याची आवड असणाऱ्यांची आठवड्यातून एकदा तरी या भागात फेरी असतेच. कुटुंबासह, मित्रांसह खाण्याचा आनंद घेण्यास सोलापूरकर आता जुळे सोलापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटला पसंती देत आहेत. भारती विद्यापीठ ते डी मार्ट रस्त्यावर तसेच डी मार्ट ते टाकळीकर मंगल कार्यालय या रस्त्यावर अनेक हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांना आकर्षिक करत आहेत. शाकाहारी आणि मांसाहरी खाणाऱ्यांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. सकाळी नाश्‍त्यासाठी गर्दी असतेच शिवाय सायंकाळनंतर जेवण, बर्थडे पार्टीसाठी वर्दळ दिसून येत आहे. 

खाऊगल्लीची वैशिष्ट्ये
- दोन किलोमीटर परिसरात भरपूर पर्याय 
- शाकाहारी-मांसाहरी जेवण, खाद्यपदार्थ 
- फॅमिलीसाठी स्वतंत्र्य बैठक व्यवस्था 
- स्वच्छ आणि सुंदर परिसर 
- ग्राहकांना सर्व्हिसही चांगली 
- मध्यमवर्गीय ग्राहकांचा वावर 
- चव आणि गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ 
- लोकांना परवडतील असे दर 

शहरातील हॉटेल्समध्ये गर्दी, गोंधळ जाणवतो आणि पार्किंगची व्यवस्था नीट नसते. त्यामुळे लोकांची वाहने आता जुळे सोलापुरातील खाऊगल्लीकडे वळू लागली आहेत. या भागात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात शाकाहारी-मासांहारी जेवण आणि अन्य खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. - संजय देशमाने, हॉटेल चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com