"ते' आता होणार हेडमास्तर..

"That 's going to be headmaster now
"That 's going to be headmaster now
नगर ः जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या सुमारे 130 जागा जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षकांची तालुकानिहाय माहिती मागविलेली आहे. या पदोन्नती प्रक्रियेला वेग आलेला आहे.
जिल्ह्यातील अंदाजे 130 जागा रिक्त आहेत. यामध्ये खुल्या वर्गातील व इतर आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यात खुल्या वर्गाच्या जागा 60च्या आसपास राहण्याची शक्‍यता आहे. इतर आरक्षणाच्या जागा 70 राहतील; मात्र आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून याचिका वेगवेगळ्या न्यायालयांत दाखल आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत फक्त खुल्या वर्गातील पदोन्नती दिल्या जाणार आहेत. उर्वरित पदोन्नती न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दिल्या जातील. ही परिस्थिती फक्त नगर जिल्ह्यात नसून, संपूर्ण राज्याची आहे. संपूर्ण राज्यातील आरक्षणातील पदोन्नती त्यामुळे रखडलेल्या आहेत.

ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू असून, सर्व तालुक्‍यांतून शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेची माहिती मागविण्यात आलेली आहे. त्यातील काही माहिती जिल्हा परिषदेकडे सादर होऊन फेरपडताळणीसाठी ती तालुकास्तरावर पाठविण्यात आलेली आहे. सध्या रिक्त दिसत असलेल्या 130 जागांचा प्राथमिक अहवाल असून, तो अंतिम होताना जागांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्‍यता आहे. या माहितीनुसार, खुल्या वर्गातील शिक्षकांना पदोन्नती लवकरच मिळणार आहे. मराठी माध्यमाची पदोन्नती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानंतर उर्दू माध्यमाची सुरू होणार आहे.

मुख्याध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, विज्ञान विषयाच्या 20 टक्के पदवीधारकांना वेतनश्रेणीचे आदेश व्हावेत, सर्व पदोन्नतीबरोबरच उर्दू माध्यमाच्या पदोन्नती कराव्यात, आदर्श शिक्षक व उत्कृष्ट कामांच्या आगाऊ वेतनवाढी देण्याची कार्यवाही व्हावी, यांसह विविध विषयांवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी शिक्षक नेते संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, भास्कर नरसाळे, माणिक जगताप, दादासाहेब अकोलकर, रामनाथ कारगुडे, गोकुळ कहाणे, मच्छिंद्र दळवी, अंबादास मंडलिक आदी उपस्थित होते.

शिक्षण विभागाचे अभिनंदन

ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यग्र असूनसुद्धा आपल्या कार्यालयाकडून अधिनस्थ प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेत करून दिवाळी गोड केली. त्याबद्दल शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्यासह शिक्षण विभागातील सर्वांचे, शिक्षक समितीतर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले.

गोपनीय अहवालाने शिक्षकांना घाम फोडला

पदोन्नतीसाठी गोपनीय अहवाल मिळावेत, यासाठी शिक्षकांची जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालय अशी धावाधाव सुरू झालेली आहे. गोपनीय अहवाल मिळविण्यात पदोन्नती मिळणाऱ्या शिक्षकांची सुटी खर्ची पडत असूनही, अहवाल मिळत नसल्याने काही शिक्षकांना आता चांगलाच घाम फुटलेला आहे.

पदोन्नतीचा दुहेरी फायदा

सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. त्याचा फायदा त्यांना होणार आहे. या पदोन्नतीमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्या वाचणार आहेत. या पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या जागांवर त्यांची नियुक्ती होणार आहे. तसेच अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांनाही या पदोन्नतीमुळे सोयीच्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com