एस. पी. साहेब, सामान्य नागरिकांना सुरक्षित राहू द्या! 

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोल्हापूर - सर्वसामान्य नागिरकाला सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करण्याचे काम पोलिस दलाचे आहे, परंतु वाढत्या घरफोड्या, चोऱ्या व महिलांच्या गळ्यातील चेन हिसकावून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. घराला कुलूप लावले तरी चारेटे ते कधी फोडतील, याचा नेम नाही. रस्त्यावरून महिलांनी चालत जावे, तर मोटारसायकलवरून येऊन कधी हिसडा मारतील याची शाश्‍वती नाही, अशी स्थिती आज शहरात दिसत आहे. तसेच सीसीटीव्हीची यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याचे यावरून दिसत आहे. 

शहरासह जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात एकापाठोपाठ एक घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. दिवस असो वा रात्र, दरवाज्याला कुलूप लावून बाहेर जायचे म्हटले तर घरी येईपर्यंत चोरट्यांकडून घर कधी साफ केले जाईल याचा नेम नाही, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपूर्वी शाहूपुरी हद्दीतील हिंमतबहादूर परिसरातील फ्लॅट फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला. पाच बंगला येथील मोबाइल शोरूम फोडून सुमारे 20 लाखांचे मोबाइल संच चोरून नेले. या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले, मात्र अद्याप बिहारमधील चोरटे हाती न लागल्याने मुद्देमाल जप्त करता आला नाही. राजारामपुरी हद्दीत चार दिवसांत तीन घरफोड्या झाल्या. त्यातील दोन तर भरदिवसा झाल्या. त्यात 25 तोळे दागिने व 52 हजारांची रोकड लंपास केली. काही दिवसांपूर्वी जवाहरनगर परिसरात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या, मात्र त्याची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही. करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खटांगळे, सांगरुळ आदी भागांतील दूध संस्थांसह पाच दुकाने फोडून चोरट्यांनी आपले धाडस दाखवले. त्याच तुलनेत आज महाडिक कॉलनी, कावळा नाकासह उपनगरात चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यातील अनेकांची नोंद पोलिस दप्तरी होत नसल्याने खरे चित्र समोर येत नाहीत. 

सेफ सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सध्या शहरात 165 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच आहे. तरीही चोरट्यांचा बंदोबस्त करण्यावर मर्यादा येत आहेत. नूतन पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्यांचा आढावा घेतला. शहरातील वाहतुकीचे नियोजन गरजेचे आहे, त्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. त्यांनी चोरट्यांचा अग्रक्रमाने बंदोबस्त करण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलावीत. पोलिसांची गस्त वाढविण्याबरोबर विशेष शोध पथकांची नियुक्ती करावी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील उणिवा दूर करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. 

कॅमेरे लावूनही चोऱ्या सुरूच 
सेफ सिटी अंतर्गत शहरातील 65 मोक्‍याच्या ठिकाणी 165 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही गतवर्षात 496 मोटारसायकली, 19 मोटारींसह 162 जबरी चोरीचे प्रकार जिल्ह्यात घडले. त्यातील 273 गुन्हेच उघडकीस आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले.

Web Title: S. P. Sir protect citizens