एस. टी. कामगार संघटनेची निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सांगली - भावजयीच्या निधनानंतर चालक वसंत माने यांना रजा नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी एस. टी. कामगार संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. तर चालक माने यांना भावजयीचा मृतदेह एस. टी. स्टॅंडमध्ये आणण्यास कुणी तरी उद्युक्त केले. त्याची चौकशी करणार असल्याचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले. 

एस. टी. चालक वसंत माने यांच्या भावजयीचे निधन झाल्याने त्यांनी ऐनवेळी वरिष्ठांना रजा मागितली. मात्र ती नाकारल्याने त्यांनी भावजयीचा मृतदेहच एस. टी. स्थानकात आणला. यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणास अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करत एस. टी. कामगार संघटनेच्या वतीने आज विभागीय कार्यालयासमोर दुपारी निदर्शने करण्यात आली. विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी माने यांना रजा नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, त्यांची चौकशी करा, आदी घोषणाबाजी केली. 

यावेळी बोलताना अध्यक्ष साळुंखे म्हणाले, ""एस. टी. मध्ये चालक, वाहकांची संख्या कमी आहे. भरती नाही. त्यामुळे कामगारांना सुटी मिळत नाही. नातेवाईक मयत झाले, मुला-मुलींचे विवाह, आजारपण अशावेळी रजा दिली जात नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. संतापाचे वातावरण आहे. मानेंना रजा नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.'' 

विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ""मानेंना रजा दिली होती. मात्र त्यांच्यापर्यंत हा निरोप गेला की नाही कळले नाही. मात्र त्यांना कुणीतरी असा प्रकार करण्यास उद्युक्त केले. त्याची चौकशी करणार आहे.'' 

वरिष्ठ अधिकारी या प्रकरणातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आमचा आरोप आहे. अधिकाऱ्यांना वाचवण्याचे वरिष्ठ पातळीवर कारस्थान सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली जावी. 
- बिराज साळुंखे, विभागीय अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना 

Web Title: S. T. Labor union protests

टॅग्स